Coronavirus : ‘कोरोना’ देखील रोखू शकलं नाही ‘प्रेमी’ युगलांच्या हिम्मतीला, शोधली प्रेम व्यक्त करण्याची नवी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत कोरोनामुळे उद्भवलेली महामारीची परिस्थिती टाळण्यासाठी तेथील सरकारने लोकांना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच लोकांना घरीच राहण्याची विनंती केली आहे. अनेक देशात लॉकडाऊनचा आदेश देण्यात आला आहे. घरी बसलेले लोक वेळ घालवण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. लोक आपापल्या बालकनीमध्ये येऊन एकत्र गाणे गात आहेत आणि कसरत करताना दिसत आहेत.

सर्वसामान्याचे जीवन अस्ताव्यस्त करणाऱ्या कोरोनाचा प्रभाव तरुणांच्या लव्ह लाइफवर झाला आहे. परंतु या दरम्यान Yale च्या दोन विद्यार्थ्यांनी त्यावर उपाय शोधून काढला आहे. एक वृत्तानुसार पॅट्रिजा गोसरका यांनी आपल्या मित्राला डलियाना वाल्डेजला सांगितले की त्यांनी एक झूम डेटिंग वेबसाइट बनवली पाहिजे.

काही तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी लव ओवर झूम नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले. या अ‍ॅपद्वारे विद्यार्थी व्हिडिओ चॅटिंगच्या माध्यमातून डेटिंग करु शकतात. 12 मार्चच्या मध्यरात्री या आयडियावर काम करण्यास सुरुवात झाली आणि 13 मार्चला 2200 पेक्षा जास्त विद्यार्थींनी यावर साइन इन केले होते.

हे अ‍ॅप गुगलसारखेच काम करते. यात कॉलेजचे विद्यार्थी ईमेल आयडीद्वारे लॉगिन करु शकतात. यात ते ज्यांच्यासोबत मॅच होतील त्यांच्यासोबत मैत्री करु शकतात आणि ब्लाइंड डेट करु शकतात.