तरुणांची लाडकी Yamaha RX 100  पुन्हा येतेय 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाईक वेड्या तरुणांसाठी आता एक खुशखबर आहे. Yamaha RX 100 ही गाडी पुन्हा एकदा नव्याने बाजारात उतरवण्याचा निर्णय यमाहाने घेतल्याची माहिती मिळाली आहे. एकेकाळी भारतीयांमध्ये प्रसिद्ध असलेली जावा नुकतीच नव्याने लाँच करण्यात आली आहे. आता जावानंतर यामध्ये आणखी एका गाडीची भर पडणार आहे.
आरएक्स १०० ला प्रीमिअम बाईकमध्ये बदलण्याचं काम सुरु आहे. ते लवकरच संपून ही गाडी बाजारात दाखल होईल, असं सांगितलं जात आहे. या बाईकने जोडलेली लोकप्रियता लक्षात घेता कंपनीने ती पुन्हा नव्या रूपात आणण्याचे ठरवले आहे.
 एक दशक भारतीयांच्या हृदयावर राज्य करणारी ही गाडी म्हणजे यमाहा आरएक्स १००. भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुसार व सध्याचा तरूणाईचा कल बघून ही बाईक पुन्हा  बाजारात आणणार आहेत. दरम्यान, यमाहा भारतीय मोटरसायकल बाजाराचा नव्याने अभ्यास करत आहे. त्यानुसार  यमाहा काही नव्या गाड्या देखील बाजारात उतरवणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Loading...
You might also like