Yami Gautam | यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
पोलीसनामा ऑनलाइन : Yami Gautam | यामी गौतम ही तिच्या साध्या लुक्समुळे देखील नेहमी चर्चेत असते. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर आता यामीचा ‘लॉस्ट’ हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.लॉस्ट हा चित्रपट एक थ्रिलर चित्रपट असून सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे लेखन शामल सेन गुप्ता यांनी केले आहे. तर एका नाट्यकरणीच्या अचानक बेपत्ता होण्यामागची सत्यता जाणून घेण्यासाठी एक तरुण क्राईम रिपोर्टर कामाला लागतो अशी या चित्रपटाची कथा आहे. (Yami Gautam)
या चित्रपटाचा संवाद रितेश शहा यांनी लिहिले आहेत. नुकताच हा चित्रपट गोव्यातील इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये दाखल करण्यात आला होता. आता यामीचा हा चित्रपट झी 5 वर लवकरच प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी अद्याप तरी तारीख जाहीर केली नाही. तर झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात पंकज कपूर, राहुल खन्ना, नील भूपालम, पिया बाजपी आणि तुषार पांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले आहे. (Yami Gautam)
The birthday girl is ready to kick off her search for the truth! #HappyBirthday @yamigautam 💕 #LostOnZEE5 coming soon.#Lost #ZEE5 pic.twitter.com/XD67VXeYEb
— ZEE5 (@ZEE5India) November 28, 2022
यामीने ‘चांद के पार चलो’ या शोमधून टेलिव्हिजन मध्ये पदार्पण केले. तर ‘यहा प्यार ना होगा कम’ मध्ये ती गौरव खन्ना बरोबर दिसली. यामीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. यानंतर टेलिव्हिजनवर काम करता करता तिने ‘विकी डोनर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमानंतर ‘उरी’, ‘काबिल’, ‘बाला’, ‘अ थर्सडे’ यासारख्या सिनेमांमध्ये देखील तिने काम करून प्रेक्षकांच्या मनात एक ठसा उमटवला होता. एवढेच नाही तरी यामीने विविध जाहीरांतीमध्ये देखील काम केले होते. मात्र फेर अँड लवली सारख्या प्रसिद्ध जाहिरातीत तिने काम करून तिला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली. यातूनच यामी गौतमीला फेअर अँड लव्हली गर्ल म्हणून ओळखले जाऊ लागले.
Web Title :- Yami Gautam | actress yami gautam upcoming film lost releasing on ott platform
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chhagan Bhujbal | “सध्याच्या स्त्रियांचे, समाजाचे आणि शिक्षण व्यवस्थेचे आदर्श चुकलेत” -छगन भुजबळ