‘या’ बोल्ड फोटोंमुळे अभिनेत्री यामी गौतम पुन्हा चर्चेत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री यामी गौतम ही अनेकांना माहित आहे. सध्या यामी तिच्या हॉट फोटोमुळे चर्चेत आहेत. सोशल मिडियावर ती नेहमी अ‍ॅक्टीव्ह असते. ती नेहमी तिचे वेगवेगळ्या पोजमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करुन तिच्या चाहत्यांना खुश करत असते. नुकतेच तिने सोशल मिडियावर वेगवेगळे हॉट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये प्रत्येक फोटोत ती वेगळी दिसत आहे. तिने एकदम बोल्ड अंदाजात फोटो शेअर केले आहे. फोटोत ड्रेसचे कलर तिला खुप छान व सुट करत आहे.

प्रत्येक फोटोतील तिचे हावभाव चाहत्यांना वेड लावणारे आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. यामी शेअर केलेल्या फोटोंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. चाहत्यांनी फोटोला कमेंटचा वर्षाव केला आहे. प्रत्येक फोटोमधील तिच्या ड्रेसिंगचा अंदाज अनोखा आहे. फोटोमध्ये ती खुप आकर्षित दिसत आहे. सगळ्या फोटोत तिचा अॅटिट्यूड वेगळा दिसत आहे. याआधी ही तिने असे अनेक बोल्ड फोटो शेअर केले होते. हे देखील फोटो चाहत्यांना पसंतीस पडले होते. त्या फोटोला ही चाहत्यांनी प्रचंड लाईक्स केले होते.

यामी ने आत्तापर्यंत अनेक यशस्वी चित्रपटात काम केले आहे. तिचा आगामी चित्रपट ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ ११ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यामी गौतम सोबत अभिनेता विकी कौशल आणि प्रसिद्ध अभिनेता परेश रावल या सर्व कलाकारांच्या मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट २०१६ ला उरी मध्ये भारतीय सैनिकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यावर आधारित आहे.