Yami Gautam | यामीला बनायचे होते IAS पण वडिलांच्या ‘त्या’ मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Yami Gautam | फेअर अँड लव्हली गर्ल म्हणून अभिनेत्री यामी गौतमीनं तिची ओळख निर्माण केली. मात्र यामीला अभिनय क्षेत्रात नाही तर IAS व्हायचं होतं. पण अशा काही घटनांनी तिला अभिनय क्षेत्रात यावे लागले. आज यामी तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील या टर्निंग पॉईंट चा प्रवास. (Yami Gautam)

 

यामीचा जन्म हिमाचल प्रदेशच्या बिलासपुर येथे झाला होता. लहानपणापासूनच यामी थोडीशी लाजरी होती. सर्व सामान्यांसारखे ती तिचे आयुष्य जगत होती. IAS बनण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून तिनं कामाला सुरुवात केली. मात्र अचानकच तिच्या या स्वप्नातून तिने यू टर्न घेऊन बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. यामीच्या बाबांच्या मित्राची पत्नी टेलिव्हिजन अभिनेत्री होती, ती घरी आल्यानंतर तिने यामीला पाहिले आणि यामी अभिनयामध्ये करियर करू शकेल तिच्यात तेवढे टॅलेंट असल्याचे तिने सांगितले. घरी आलेल्या या अभिनेत्रीने यामीच्या आईला यामीला थेटर जॉईन करण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी यामीचं फोटोशूट करून मुंबईच्या एका नामवंत प्रोडक्शन हाऊस मध्ये ते पाठवले. (Yami Gautam)

यामी लॉ चा अभ्यास करत होती. मात्र या सगळ्या घटनेने यामीचं लॉ मध्ये लक्षच लागत नव्हते. यानंतर तिने लॉ चा अभ्यास सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी यामीच्या आईने तिला अभिनयात करिअर करण्याचा सल्ला दिला. यानंतर यामीने मॉडलिंग सुरू केले. या संपूर्ण प्रवासात तिच्या आईने तिला खूप सपोर्ट केला होता. यानंतर यामीने ‘चांद के पार चलो’ या शोमधून टेलिव्हिजन मध्ये पदार्पण केले. तर ‘यहा प्यार ना होगा कम’ मध्ये ती गौरव खन्ना बरोबर दिसली. यामीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकली होती. यानंतर टेलिव्हिजनवर काम करता करता तिने ‘विकी डोनर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमानंतर ‘उरी’, ‘काबिल’, ‘बाला’, ‘अ थर्सडे’ यासारख्या सिनेमांमध्ये देखील तिने काम करून प्रेक्षकांच्या मनात एक ठसा उमटवला होता. एवढेच नाही तरी यामीने विविध जाहिरात मध्ये देखील काम केले. मात्र फेर अँड लवली सारख्या प्रसिद्ध जाहिरातीत काम करून तिला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली. यातूनच यामी गौतमीला फेअर अँड लव्हली गर्ल म्हणून ओळखले जाऊ लागले.

 

Web Title :- Yami Gautam | yami gautam birthday special he wanted to become an ias before actress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शेकोटीवरुन अल्पवयीन मुलांनी टपरी व्यावसायिकाचा पालघनने वार करुन केला खून; खडकीतील घटना

Punit Balan | युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव

Sanjay Raut | ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’; ‘मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी…’ – संजय राऊत