पोलीसनामा ऑनलाईन : प्रसिद्ध चित्रपटनिर्माते आणि चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra) यांच्यावर बनलेला एक माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘फादर ऑफ रोमान्स’ अशी ओळख असणाऱ्या यश चोप्रा यांच्यावर आधारलेल्या ‘द रोमँटिक्स ‘ या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार ज्यांनी यश चोप्रा यांच्यासोबत काम केलाय ते त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. (Yash Chopra)
या सिरीजमध्ये यश चोप्रा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत. त्यांना फादर ऑफ रोमान्स का म्हंटलं जातं ?, त्यांनी एवढं नाव कसं कमावलं ?अश्या बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत. या ट्रेलरमध्ये आपल्याला शाहरुख खान, आमिर खान, ऋषि कपूर, अमिताभ बच्चनपासून रणवीर सिंग, हृतिक रोशन अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, भूमी पेडणेकरसारखे कलाकार यश चोप्रा यांच्या आठवणी सांगताना दिसत आहेत.
व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्त ‘द रोमँटिक्स ‘ ही सीरिज 14 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन स्मृती मुंध्रा यांनी केलं आहे. ट्रेलरमध्ये यश चोप्रा (Yash Chopra) यांचा मुलगा आदित्य चोप्राचा देखील आवाज ऐकू येतो. आदित्य चोप्राने 1995मध्ये मुलाखत दिली होती. आता त्यानंतर त्याची मुलाखत ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘द रोमांटिक्स’ या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता अनेक नेटकरी ही सीरिज चालू होण्याची वाट बघत आहेत.
Web Title :-Yash Chopra | documentary series on father of romance director late yash chopra will be released on netflix
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील
Pune Crime News | ‘आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा’, कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची अनोखी योजना