‘KGF Chapter 2’ हिट करण्यासाठी लढवली ‘ही’ शक्कल, ‘या’ ठिकाणी शूट होणार सर्वात ‘महागडं’ गाणं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ सुपरस्टार यश सध्या मोस्ट अवेटेड सिनेमा केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2)च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. केजीएफ चॅप्टर 2 या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. चाहत्यांची आतुरता पाहता मेकर्स हा सिनेमा हिट करण्याची एकही संधी सोडत नाही असं दिसत आहे. अलीकडेच समोर आलेल्या एका मीडीया रिपोर्टनुसार, मकर्स हैद्राबादमधील लोकप्रिय ताज फलकनुमा पॅलेसमध्ये सिनेमातील सर्वात महागड्या गाण्याची शुटींग करण्याची तयारी करत आहेत. काही मोजक्याच लोकांना या लोकेशन्सवर येण्याची परवानगी असणार आहे.

रिपोर्टनुसार केजीएफ चॅप्टर 2 चे डायरेक्टर प्रशांत नील यांनी एकदम वेगळ्या ठिकाणी शुटींग करण्याचा प्लॅन करत होते जी त्यांच्या जीवनातील अनुभवांपेक्षा मोठी असेल. रिपोर्टनुसार, सुपरस्टार यशची फीमेल फॅन फॉलोविंग मोठी आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या या फीमेल फॅन पॉप्यलर जागांवर नक्की येतील. काही फॅन्सच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे जेणे करून ते त्या ठिकाणी येऊ शकतील.

केजीएफ चॅप्टर 2 हा सिनेमा 2018 साली आलेल्या केजीएफ चॅप्टर 1 सिनेमाचा सिक्वल आहे. कन्नड सुपरस्टार यश आणि श्रीनीधी शेट्टी यांच्या व्यतिरीक्त या सिनेमात संजय दत्त आणि रवीना टंडन हेदेखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सिनेमाच्या पहिल्या पार्टनं जवळपास 200 कोटींची कमाई केली होती.

View this post on Instagram

#kgfchapter2 #kgfchapter2movie

A post shared by KGF CHAPTER 2 MOVIE (@kgfchapter2movie) on

View this post on Instagram

#kgfchapter2 #kgfchapter2movie

A post shared by KGF CHAPTER 2 MOVIE (@kgfchapter2movie) on

You might also like