YASHADA Pune | यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे : YASHADA Pune | कृषी व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे यशदा येथे १६ मे रोजी सकाळी ९.३० ते संध्या. ६ या वेळेत आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांनी दिली आहे.

कार्यशाळेला भारत सरकारच्या कृषी विभागातील सह सचिव (आयएनएम), देशाच्या पश्चिम भागातील राज्यांचे कृषी सचिव, आयुक्त, संचालक, आयसीएआरचे शास्त्रज्ञ, चार कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रिय कृषी मंत्रालयातील अधिकारी, निवडक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. (YASHADA Pune)

या कार्यशाळेत नैसर्गिक शेतीबाबतचे धोरण आणि त्याअनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत चर्चा होणार असून यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दिव आणि लक्षद्वीप या ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील २५० शास्त्रज्ञ, अधिकारी व शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai North Lok Sabha | उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक

Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)