Yashaswini Sanman Award | यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे कर्तृत्वान महिलांना ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’; खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा

कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना अर्ज करण्याचे आवाहन; पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Yashaswini Sanman Award | यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ (Yashaswini Sanman Award) सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या (Yashwantrao Chavan Centre) कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ही घोषणा केली.

या पुरस्कारांसाठी आजपासूनच म्हणजे १८ मार्च पासून अर्ज मागविण्यास सुरु झाले असून अंतिम मुदत ३० एप्रिल २०२३ ही असल्याचे सुळे यांनी सांगितले. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असून पुरस्कारार्थीची घोषणा जून मध्ये करण्यात येणार आहे. देशाला पथदर्शी ठरलेले महिला धोरण महाराष्ट्रात मंजूर झालेल्या दिवशी म्हणजे २२ जून रोजी हे पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Yashaswini Sanman Award)

या पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रासाठी ‘यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार’ या नावाने दिला जाणार असून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकरी महिलेची निवड करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार ‘यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार’ या नावाने ओळखला जाईल. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या महिलेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येईल. तर औद्योगिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी उद्योजिका सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

सामाजिक क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करुन महाराष्ट्राच्या विकासात भर टाकणाऱ्या
महिलेस ‘यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. याबरोबरच पत्रकारीतेच्या
क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारास ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार’
देण्यात येणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

या पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या
www.chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेबसाईटवरच गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन सुळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ९८८११४९३९६ या मोबाईल क्रमांकावर किंवा [email protected] या इमेलवर संपर्क साधावा.

Web Title :  Yashaswini Sanman Award | ‘Yashaswini Samman Award’
to accomplished women by Yashwantrao Chavan Centre; Announcement by MP Supriya Sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाने लेकी बाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाली “तिला कालांतराने थेरपीची गरज भासू शकते….”

Mohit Kamboj | ‘उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन अनिल जयसिंघानी गजाआड आता…’, भाजप नेते मोहित कंबोज यांचे खळबळजनक ट्विट