Yashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू

महाबलीपूरम (तामिळनाडू) : वृत्तसंस्था – दाक्षिणात्य अभिनेत्री (southern actress) याशिका आनंद (Yashika Anand) हिचा कार अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात महाबलीपुरममध्ये (Mahabalipuram) झाला आहे. याशिका आपल्या मित्रांसह ट्रीपला निघाली होती. त्यावेळी त्यांची कार रस्त्यावरील डिव्हाडरला धडकली आणि रस्त्यावरील एक खड्ड्यात जाऊन कोसळली. दुर्देवी म्हणजे की, या अपघातामध्ये Yashika Anand समवेत असलेली मैत्रीण वल्लीचेट्टी भवानी (Vallichetti Bhavani) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर याशिकाला गंभीर जखम झाली आहे.

Yashika Anand | south indian actor yashika aanand injured in accident is critical friend dies

याबाबत अधिक माहिती अशी की, धुरुवंगल पथिनारु’ फेम आणि तमिळनाडुची एक लोकप्रिय मॉडेल याशिका आनंदचा (Yashika Anand) (25 जुलै) रोजी रात्री 1 च्या सुमारास अपघात (Accident) झाला. या कारमध्ये याशिकासह चौघेजण होते. कार खड्ड्यात पडल्यानंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. तिघेही जखमी अवस्थेत होते. यामधील याशिकासह आणखी दोघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात (hospital) हलवण्यात आले. मात्र, याशिकाची मैत्रिण भवानी कारमध्येच अडकली होती. तिला वाचवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. काही वेळांनी तिला बाहेर काढले मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

‘अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर भवानीचा मृतदेह पोस्टमार्टम (pm) साठी पाठवण्यात आला. चारही जण दारूच्या नशेत असल्याचा संशय तेथील पोलिसांनी वर्तविला आहे. परंतु, गुन्हा नोंद करण्यासाठी डॉक्टरांच्या अहवालाची पोलिस वाट बघत असल्याचे समजते. तसेच, गंभीर जखमी झालेल्‍या यशिकाला रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. कार कोण चालवत होते आणि चालकाने मद्‍यपान केले होते का, याचा तपास आणि शोध तेथील पोलिस करीत आहेत.

या दरम्यान, याशिका आनंद ही तामिळ बिग बॉसमुळे चांगलीच प्रसिद्ध झाली होती. याशिका ही
तामिळनाडूमधील प्रसिद्‍ध मॉडेल आहे. अनेक चित्रपटांमध्‍ये तिने सहायक अभिनेत्रीच्‍या भूमिका
साकारल्‍या आहेत. यामध्‍ये कवलई वेंदम, नोटा आणि ध्रुवांगल पथीनारु या चित्रपटांचा समावेश आहे.

हे देखील वाचा

Police Crime News | पोलिस दलातील महिलेचे विवस्त्र फोटो व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

Voter ID Card | तुमचं ‘मतदान कार्ड’ हरवलंय तर ‘नो-टेन्शन’ ! ‘या’ पध्दतीनं करा डाऊनलोड, मिनीटांमध्ये होईल काम; जाणून घ्या प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Yashika Anand | south indian actor yashika aanand injured in accident is critical friend dies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update