Shocking Video : “यशोदा मय्या होती कृष्णाची ‘प्रेमिका’?…”, चक्क सद्गगुरुंचा व्हिडिओ होतोय ट्रोल; कंगणानं घेतली त्यांची बाजू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या अध्यात्मिक, रसाळ आणि अर्थपूर्ण प्रवचनांसाठी प्रसिध्द असणारे सदगुरु जग्गी वासुदेव आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे टीकास्तोत्र झाले आहेत. मात्र त्यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगणा उतरली व सद्गुरुंना ट्रोल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले. तिनंही त्यांच्या वक्तव्यावर वेगळ्या बाजूनं काही मुद्दे मांडत ट्विट केले. त्यामुळे सुरुवातीला सद्गुरुंना होत असलेल्या विरोधाची प्रमाणात आता कमी झाली आहे.

त्याचे झाले असे की सदगुरु यांनी यशोदेला कृष्णाची प्रेमिका संबोधल्यानं त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यापूर्वीही सदगुरु त्यांच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. कंगणानं केलेल्या सपोर्टमुळे तर आणखी त्यांच्यावर नाराजीचा सूर व्यक्त होत असल्याचेही दिसून आले आहे. कंगनाचे हल्ली विरोधक वाढताना दिसत आहेत आणि त्या मुळेच सद्गुरू जग्गीवासुदेव यांना देखील अधिक विरोध होताना दिसून आला.

सध्या कंगणा तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यांमुळे प्रसिध्द आहे. तिचा बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्री म्हणून उल्लेख केला तर हरकत नाही. अनेक वर्षांपासून कंगना अनेक दिग्गजांबरोबर पंगा घेत आलेली दिसतीय. त्यामुळे तिने अनेकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपल्या वक्तव्यांवर ठाम राहणे अशीही कंगना रानौतची ओळख आहे. त्यामुळे तिला विरोध करणाऱ्यांचा ती आपल्या खास पध्दतीनं उत्तर देते.

आताही तिनं सदगुरु यांच्या बाजूनं किल्ला लढवला आहे. कंगणा म्हणाली, काही वामपंथी नेहमीच सदगुरु यांना त्रास देतात. ते त्यांच्यासाठी एक मोठ्या डोकेदुखीचा विषय आहेत. मात्र त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही पण लोकं त्या टीकाकारांना एवढं महत्व का देतात हा खरा प्रश्न आहे. सदगुरु नेहमीच राष्ट्रवाद आणि हिंदू संस्कृती योद यांना महत्व देत असल्याचे आपल्यला दिसून आले आहे. दक्षिणपंथी त्यांना यासाठी त्रास देतात की ते उदारमतवादी आहेत आणि हिंदू देवदेवातांच्या धर्मग्रंथांचा सन्मान करताना शक्यतो दिसत नाहीत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सदगुरु यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते म्हणाले होते, यशोदा ही कृष्णाची प्रेमिका होती. मात्र नेटकऱ्यांनी त्याचा अर्थ वेगळा काढला होता आणि त्याचमुळे सदगुरु इतके ट्रोल झाले होते. त्यानंतर ईशा फाऊंडेशनच्या वतीनं स्पष्टीकरणही देण्यात आले होते व त्यात असे म्हटले होते कि, त्या व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली आहे. सदगुरु यांनी यशोदेला प्रेमिका नव्हे तर भक्त म्हटले होते.