Yashomati Thakur On Navneet Ravi Rana | ‘औकातीत रहायच, माझ्या बापाने आणि आम्ही…’ नवनीत राणांच्या आरोपांवर यशोमती ठाकूर भडकल्या

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Yashomati Thakur On Navneet Ravi Rana | लोकसभा निवडणुकीवेळी माझ्याबरोबर फिरून रवी राणांकडून यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या. रक्ताचे आश्रू ढाळण्याचं काम ठाकूर यांनी केलं होतं, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. राणांच्या आरोपांवर यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिले आहे. गेल्या निवडणुकीत मी पैसे घेतले असल्याचं सिद्ध करा, मी राजकारण सोडून देते असे आव्हान यशोमती ठाकुर यांनी राणा दाम्पत्यांना दिला. तसेच माझ्या बापावर बोलला तर तुम्हाला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराही ठाकुर यांनी राणा दाम्पत्याला दिला. (Yashomati Thakur On Navneet Ravi Rana)

काय म्हणाल्या नवनीत राणा?

तिवसा येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा यांनी थेट यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 2019 च्या लोकसभेत ताईंनी आमदार रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या आणि प्रचार दुसऱ्याचा केला. सगळी मतं ही विरोधकांना दिली, तुम्ही काय इमानदारीची भाषा करताय? अशी जहरी टीका खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकुर यांच्यावर केली. (Yashomati Thakur On Navneet Ravi Rana)

पैसे घेतल्याचे सिद्ध करा

नवनीत राणांच्या आरोपांना यशोमती ठाकुर यांनी प्रत्युत्तर देताना राणा दाम्पत्याने ते सिद्ध करुन दाखवावं असं आवाहन त्यांनी दिलं. त्या म्हणाल्या, औकातीत रहायच. माझ्या बापाने आणि आम्ही जमिनी देण्याचं काम केलं आहे, घेण्याचं नाही. निवडणुकीवेळी मी पैसे घेतल्याचं सिद्ध करा नाहीतर तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आज एखादी निवडणूक आली तर आम्हाला एखादं वावर विकावं लगतं, अशा शब्दात ठाकुर यांनी नवनीत राणांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन ! दि. २४ सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

पुणे : सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची दीड कोटींची फसवणूक, प्रचंड खळबळ

गणपती वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण करुन तोडफोड; लोणी स्टेशन येथील चौघांवर गुन्हा दाखल (Video)

कल्याणीनगर : सिक्रेट पोलीस असल्याचे सांगत चोरट्याने मोबाईल घेऊन ठोकली धुम

Smriti Irani | निराधार मुलांच्या संगोपनासाठी ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार; केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी