Yashomati Thakur | संजय राऊत भारत जोडो यात्रेत आल्यास त्यांचे स्वागतच – यशोमती ठाकूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसची (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरु असलेली कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. त्यामुळे या यात्रेला महाराष्ट्र काँग्रेसकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीचे नेते देखील या यात्रेत सहभागी होत आहेत. त्यावर यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) या यात्रेला भेट देण्याची शक्यता आहे. त्यावर यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) बोलत होत्या.

 

शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दबंग माणूस आहे. ते नेहमी खरे बोलतात आणि रेटून बोलतात. त्यांचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. त्यामुळे ते जर का भारत जोडो यात्रेत आमच्यासोबत आले आणि आम्हाला मिसळले, तर छान आहे. त्यांचे स्वागत आहे. कारण शेवटी आमचा सर्वांचा उद्देश एकच आहे. समता आणि सर्वसमावेशक हा महाविकास आघाडीचा हेतूच आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत यावे, असे ठाकूर म्हणाल्या. युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील या यात्रेत सहभागी होतील, अशी आम्हाला आशा आहे. देशात अरेरावीचे राज्य आहे. त्यामुळे याच्या विरोधात सर्व एकत्र आले तर चांगलेच आहे. देशात ईडी आणि इतर सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग होत आहेत. त्यांचा कुठेपर्यंत दुरुपयोग करावा, याचे ताजे उदाहरण म्हणजे संजय राऊत हे आहेत.

यंग इंडिया (Young India) ही काँग्रेसची संलग्न संस्था आहे. त्यांना काही निधी दिला गेला होता.
केंद्र सरकारने त्यांच्यावर देखील ईडीची कारवाई केली. त्यामुळे आम्हाला मोठा त्रास झाला.
दुसरीकडे अमित शहा (HM Amit Shah) यांच्या मुलाच्या खात्यावरील पैसे एवढे वाढले आहेत,
त्यांच्यावर कोणतीही कारवाई केंद्र सरकार करत नाही.
तसेच शिंदे यांच्या गटातील 40 आमदार वॉशिंग मशीनमध्ये बसलेले आहेत, त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठे आरोप झाले होते.
आता त्यांची चौकशी का होत नाही, असे देखील यशोमती ठाकूर यांनी यावेळी विचारले.

 

Web Title :- Yashomati Thakur | Sanjay Raut is welcome if he comes to Bharat Jodo Yatra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharat Jodo Yatra | देशमुख बंधूंची अनुपस्थिती आणि प्रकाश आंबेडकरांच्या भाकितावर काँग्रेसचे स्पष्टीकरण

Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या सुटकेसाठी चंद्रकांत खैरे यांचे थेट देवांच्या कायदामंत्र्याला साकडे

Jacqueline Fernandez | आता न्यायालयाकडून ही ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; “जॅकलिनला अद्याप अटक का नाही?”