…म्हणून काकूंच्या 1800 रुपयांच्या व्हिडिओवर मंत्री यशोमती ठाकूर यांनी टोचले कान

पोलिसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर घरगुती काम करणार्‍या एका महिलेचा 1800 रुपयांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकजण हा व्हिडीओ सोशल मीडिया शेअर करुन मजेशीर कॅप्शन देत आहे. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा व्हिडीओ शेअर करणार्‍यांचे कान टोचले आहेत.

मेहनत करून घर चालवणार्‍या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणे हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत. व्हिडीओमध्ये  महिला काही तरुणांना तिच्या कामाचे 1800 रुपये मागत आहे. ते तरुण तिला 1800 रुपये दिले असल्याचे जीव तोडून सांगत आहे. मात्र, तरीही ती महिला ऐकायला तयार दिसत नाही. तरुणांनी महिलेला पाचशे रुपयांच्या तीन नोट आणि दोनशे रुपयाची एक नोट आणि शंभरची एक नोट, असे अठराशे रुपये दिलेत. महिलेला सुद्धा हे मान्य आहे. ती म्हणते की तुम्ही मला 500 च्या तीन नोटा दिल्यात हे मला मान्य आहे. पुढे ती म्हणते की तुम्ही मला दीड हजार आणि तीनशे रुपये दिलेत. मात्र, मला माझे 1800 रुपये हवे असल्याचे सांगत आहे.