काँग्रेस कार्यध्यक्षांच्या ‘या’ ट्विटमुळे सत्तेची गणित सुटणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच काँग्रेसच्या गोटातून गोड बातमी येण्याची शक्यता वाढली आहे. राज्यातील समीकरणे मिनटा मिनटाला बदलत असतानाच काँग्रेस कार्यध्याक्षांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटमुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्याता वाढली आहे. काँग्रेस कार्य़ाध्यक्ष आणि नेत्या यशोमती ठाकूर यांच्या ट्विटने आता राज्यातील सत्ता समीकरणाने वेगळे वळन घेतल्याचे दिसून येत आहे.

सत्ता स्थापनेवरून राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत बैठका घेत आहेत. तर काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईमध्ये बैठका घेत आहे. राष्ट्रवादी सत्ता स्थापनेचा दावा करणार की नाही याकाडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच राज्यपालांकडून केंद्रीय गृहमंत्रालायाकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले. मात्र, राजभवानकडून अशा प्रकारची शिफारस करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले असून राजभवनाकडून या वृत्ताचे खंडन केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आज संभाव्य बैठकीची शक्यता दुरावली अशी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात आज दुपारी काँग्रेसचे तीन मोठे नेते दाखल होत आहेत. हे नेते मुंबईत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा करणार आहेत. त्यातच यशोमती यांचे हे ट्विट शिवसेनेसाठी दिलासा देणारे ठरू शकते. दरम्यान, शरद पवारांनी अहमद पटेल यांना फोन करून आजच्या ऐवजी दोन दिवसांनी येण्यास सांगितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज सत्तास्थापनेचा दावा करण्याचा मुहुर्त साधणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Visit : Policenama.com