Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’ शिवाय आणखी ‘ही’ दोन नावे, चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) आणि माजी बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष (Former BMC Standing Committee Chairman) यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या डायरीची चर्चा राज्यात जोरदार सुरु आहे. आयकर विभागाच्या (Income Tax Department) धाडीमध्ये मिळालेल्या यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये (Diary) ‘मातोश्री’ (Matoshri) शिवाय अन्य दोन नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये एक नाव ‘M-TAI’ तर दुसरे नाव ‘केबलमॅन’ (Cableman) असे आहे. यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यासोबत आता इतरांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. यशवंत जाधव यांनी डायरीमध्ये सर्व व्यवहार लिहून ठेवले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या डायरीतून पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे. यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये दोन शिवसेना नेत्यांची नाव समोर आली आहेत. यातील एक जण हे सध्या मंत्री (Minister) आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

जाधव यांच्या डायरीत 2 कोटी रुपये आणि 50 लाख मातोश्रीला दिल्याचा उल्लेख होता. मात्र आणखी दोन नावांचा उल्लेख आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यातील एक मंत्रीपदावर आहेत तर दुसऱ्या महिला नेत्या आहेत. ज्या बीएमसीत चर्चेत असतात.

जाधव यांच्या डायरीत केबलमॅन अश्या एका नावाचा उल्लेख आहे. त्यापुढे त्यांनी 75 लाख, 25 लाख आणखी 25 लाख असे 1 कोटी 25 लाख दिल्याचा उल्लेख केला आहे. तर M-TAI अस एक नाव लिहिलं असून त्यापुढे 50 लाख दिल्याचा उल्लेख आहे. या दोन लोकांविषयी इन्कम टॅक्सकडून माहिती मिळवली जाणार असून लवकरच त्यांना समन्स (Summons) बजावले जाण्याची शक्यता आहे. मात्र जाधव यांच्या डायरीमधील केबलमॅन आणि M-TAI असा उल्लेख असणारे हे व्यक्ती कोण हे अद्याप समजू शकले नाही.

 

अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता
आयकर विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाधव यांच्या डायरीमध्ये कंत्राटदारांची नावे (Contractors),
काही कंपन्यांची नावे (Companies Names), काही व्यक्तींची नावे, अधिकाऱ्यांची नावे, काही राजकीय व्यक्तींची (Political Person) नावे लिहिली आहेत.
तसेच अशा काही नोंदी आहेत ज्यांचा अर्थ आयकर विभाग शोधत आहे.
भविष्यात या डायरीमुळे अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title :- Yashwant Jadhav | two more names found in shvsena leader yashwant jadhavs diary

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा