जबरी चोरी करणाऱ्या सराईतास यवत पोलीसांकडून अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – लग्नाच्या कार्यक्रमासाठी पाहुण्यांकडे आलेल्या इसमाला मारहाण करून त्याची दुचाकी आणि सोन्याची चैन चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.०६ डिसेंबर रोजी सायं. ५:३० वा चे. सुमारास फिर्यादी दिलीप लक्ष्मण चौधरी, (वय – ३८ वर्षे, व्यवसाय – शेती, रा.सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हे त्यांचे शाइन मोटार सायकल नं. एम. एच. १२/ के.झेड/९५०८ ही वरून त्यांचे पाहुणे स्वप्नील काळे यांच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी पारगांव ता. दौंड येथे आले होते.

लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर ते मोटार सायकलने आपल्या सोरतापवाडी ता. हवेली येथील घरी जाण्यासाठी चौफुला बाजुकडे निघाले असता रात्री ७:३० वाचे. सुमारास बोरीपार्धी गांवच्या हददीत पंडीता रमाबाई मुक्ती मिशन जवळ असलेल्या ब्रिजवर आल्यावर त्यांना थंडी वाजू लागली यावेळी त्यांनी मोटार सायकल रोडच्या बाजूला उभी करून मोटार सायकलच्या डिक्कीतुन स्वेटर काढत असताना तेथे त्यांच्या जवळ एक अनोळखी इसम येऊन त्याने “तुम्ही कुठले आहेत, तुम्ही कोठे चालला” असे म्हणून फिर्यादीशी झटापट, मारहाण करून फिर्यादीचे गळ्यातील दोन सोन्याच्या चैनी जबरदस्तीने घेत फिर्यादीस ढकलून देवून फिर्यादीची शाईन मोटार सायकल जबरदस्तीने चोरून घेऊन फरार झाला होता.

या चोरीमध्ये एकुण १,०६,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. सदरचा गुन्हा गंभिर स्वरूपाचा असल्याने वरीष्ठांनी तात्काळ तपास करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांनी खालील पोलीस पथकास गुन्हा तात्काळ उडाकीस आणणे बाबत सूचना करत आरोपी माउली उर्फ भावडया उर्फ भाउ मच्छिंद्र बांदल. वय. २२ वर्षे, रा. पारगांव, ता. दौंड, जि. पुणे. याला गुन्हयात अटक करून त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली फिर्यादीची शाईन मोटार सायकल व फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन असा एकुण किं. रू. ९५,०००/- चा मुददेमाल गुन्हयात जप्त करण्यात आलेला आहे.

यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर खुन, चोरी तसेच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सो, संदीप पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, जयंत मिना, मा. उप.विभागिय पोलीस अधीकारी सो, डॉ. सचिन बारी व मा.पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यवत पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पो. उप. निरीक्षक नितीन लकडे, पो.ना.गणेश पोटे, दशरथ बनसोडे, पो.कॉ.दामोदर होळकर यांचे पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/