Yavatmal ACB Trap | दारु विक्रेत्याकडून 90 हजार रुपयांची लाच घेताना नगरसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – परवानाधारक दारु दुकानाविरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्यासाठी 90 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नगरपंचायत नगरसेवकाला (Corporator) यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Yavatmal ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. यवतमाळ एसीबीने ही कारवाई (Yavatmal ACB Trap) बुधवारी (दि.18) दुपारी मारेगाव येथे केली. अनिल उत्तमराव गेडाम Anil Uttamrao Gedam (वय- 45, रा. मारेगाव) असे लाच स्वीकारणाऱ्या नगरसेवकाचे नाव आहे.

अनिल गेडाम हे प्रभाग क्र. 13 चे प्रतिनिधीत्व करतात. गेडाम यांनी परवाना असलेल्या किरकोळ देशीदारु दुकानाविरुद्ध तक्रार केली आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी गेडाम यांनी दुकानदाराकडे 90 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी यवतमाळ एसीबीकडे (Yavatmal ACB Trap) तक्रार केली. पथकाने 10 जानेवारी रोजी पडताळणी केली असता तक्रार मागे घेण्यासाठी नगरसेवक अनिल गेडाम यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

यवतमाळ एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि.18) मारेगाव येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 90 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना नगरसेवक अनिल गेडाम यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेडाम यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधिक्षक मारुती जगताप
(SP Maruti Jagtap), अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Addl SP Arun Sawant),
अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware), उप अधीक्षक शैलेश सपकाळ
(DySP Shailesh Sapkal) यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर
(Police Inspector Vinayak Karegaonkar), ज्ञानेश्वर नालट, जमादार अब्दुल वसीम, महेश वाकोडे,
सचिन भोयर, सुधीर कांबळे, राहुल गेडाम यांनी केली.

Web Title :- Yavatmal ACB Trap | a corporator was arrested for accepting a bribe of 90 thousand in yavatmal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar | भाजप नेते आशिष शेलार यांचे संजय राऊत यांना खडे बोल; म्हणाले…

Aurangabad Crime News | दारुच्या नशेत महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढोमेंचं अखेर निलंबन

Maharashtra Politics | ‘अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद धमकीमुळे मिळालं’ केंद्रीय मंत्र्याच्या दाव्याने खळबळ