महिला तलाठ्यास 1300 रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळ जिल्ह्यातील एका महिला तलाठ्याला 1300 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ममता मोतीराम पवार (रा. आर्णी) असे पकडण्यात आलेल्या महिला तलाठी यांचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

यातील ममता पवार या आर्णी तहसील कार्यालयाच्या साजा साकूर येथे तलाठी आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांनी त्यांच्या व त्यांची वहिनी यांचे नावे जमीन घेतली आहे. या शेतजमिनीची अभिलेखावर नोंद करुन यासंबंधी फेरफार व तक्रारदार यांचे नावाचा सुधारित सातबारा देण्यासाठी लोकसेवक ममता यांनी त्यांच्याकडे 2 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सायंकाळी तडजोडीअंती 1300 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे.

अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सापळा कारवाई करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like