यवतमाळ येथे एसटी उलटून, २५ प्रवासी जखमी तर ३ गंभीर

यवतमाळ: पोलीसनामा ऑनलाईन
पुसद येथून राजुराकडे निघालेल्या बसचा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून ३ प्रवाशांची प्रकृती गंभीर जखमी आहे. बसपुढे रोही (जंगली प्राणी) आल्यामुळे बस पलटी होऊन  हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत मिळालेली आधी माहिती अशी की, एसटी  महामंडळाची बस (क्रमांक एम. एच. 40 वाय 5564) वणी मारेगाव दरम्यान गोपाळा गावालगत  उलटली . बसपुढे अचानक रोही (जंगली प्राणी ) आल्यामुळे हा अपघात झाल्याचे  बसच्या चालकाने सांगितले . मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुरमारास ही दुर्घटना घडली.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रशासनाही हजर झाले आहे. याबाबत तत्काळ संबंधित डेपोला माहिती देण्यात आली असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B009WNA9V6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7b04e04-9a37-11e8-bfa0-15c15d23fdee’]