Yavatmal Crime | आरोपीचे पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Yavatmal Crime | पुणे पोलिसांनी (Pune Police) क्रिकेट सट्ट्याचा (Cricket Betting) गुन्ह्याचा तपास केला. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) किनवट येथील आरोपीचा सहभाग असल्याचे समोर आले. आरोपीला ताब्यात घेऊन पुणे पोलीस यवतमाळ (Yavatmal Crime) येथे आले. याठिकाणी एका हॉटेलमध्ये पोलिसांनी आरोपीसह मुक्काम केला. शुक्रवारी (दि.1) पहाटे आरोपी पसार (Accused Absconding) झाला. रामदेव मोहनलाल शर्मा Ramdev Mohanlal Sharma (वय-43) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या (Pune Police Crime Branch) पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख (API Amrish Deshmukh) गुन्ह्याचा तपासासाठी आले होते. त्यांनी किनवट येथून रामदेव शर्मा याला अटक (Arrest) केली होती. यवतमाळातही (Yavatmal Crime) क्रिकेट सट्ट्याच्या अनुषंगाने काही आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस रामदेवला घेऊन यवतमाळ येथे मुक्कामी थांबले होते. त्यांनी दारव्हा मार्गावरील एका हॉटेलात मुक्काम केला होता.

 

शुक्रवारी पहाटे आरोपी रामदेव शर्मा हा पोलिसांची नजर चुकवून पसार झाला.
हा प्रकार लक्षात येताच पुणे पोलिसांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात (Avdhut Wadi Police Station) धाव घेतली.
तेथील पोलिसांना आरोपी पसार झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.
अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपी रामदेव शर्माचा शोध सुरु केला आहे.

 

Web Title :- Yavatmal Crime | cricket betting accused absconding through the hands of pune police crime branch yavatmal crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde | अबब…शिंदे गटाच्या गुवाहाटीतील 8 दिवसाच्या फक्त जेवणाचं बिल तब्बल इतके लाख, एकूण खर्च किती?

 

Devendra Fadnavis | फडणवीसांचे आमदार आणि कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘नाराज होऊ नका, आपलंच सरकार’

 

Deepak Kesarkar | ‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’ – दीपक केसरकर