Yavatmal Crime | सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरचा खून, कॉलेजमध्ये प्रचंड खळबळ

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Yavatmal Crime | यवतमाळ येथे एका सरकारी महाविद्यालय (Government Medical College) परिसरात एका डॉक्टरचा निर्घुण खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार (Yavatmal Crime) समोर आला आहे. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात डॉक्टरचा खून करण्यात आला आहे. अशोक पाल (मूळ रा. ठाणे) असं खून झालेल्या डाॅक्टराचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात आणि वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ माजली आहे.

याबाबत माहिती अशी की, अशोक पाल (Ashok Pal) यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बुधवारी रात्रीच्या दरम्यान आढळून आला. धारदार शस्त्राने त्याची हत्या करण्यात आली. हा खून (Murder) नेमका कुणी आणि का केला याबाबत अद्याप समजले नाही. परंतु, या घटनेमुळे संपूर्ण विद्यार्थी संतप्त झाले आहेत. तसेच, रूग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात वैद्यकीय सुविधा मिळणार नाहीत. महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि पोलीस प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळेच महाविद्यालय परिसरात हत्या (Yavatmal Crime) झाली. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

दरम्यान, या आगोदर देखील महाविद्यालयात अशा घटना घडल्या आहेत, त्यामुळे हत्येच्या घटनेसाठी संबंधित प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा

Nilofar Malik | नवाब मलिकांची मुलगी निलोफर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस, माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

Diabetes Awareness Month 2021 | अनियंत्रित डायबिटीज पोखरू शकते तुमचे संपूर्ण शरीर, ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग

Maharashtra Police | राज्यातील 10 परिविक्षाधीनपोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्तांच्या (DySp / ACP) नियुक्त्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Yavatmal Crime | government medical college doctor brutally murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update