Yavatmal Crime | भरदिवसा गोळीबाराचा थरार ! पुसदमध्ये डोक्यात गोळी लागून मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाचा मृत्यू

पुसद : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – यवतमाळ (Yavatmal Crime) जिल्ह्यातील पुसद (Pusad ) येथे भरदिवसा गोळीबार (Firing) झाला. या घटेनेत दोन अज्ञात व्यक्तींनी एका तरुणावर गोळ्या झाडल्या. यामध्ये एक गोळी डोक्यात लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू (shot dead) झाला. ही घटना पुसद-वाशिम रोडवर (Pusad-Washim Road) आज (रविवार) दुपारी दीडच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या गोळीबारीच्या घटनेमुळ यवतमाळ (Yavatmal Crime) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

इम्तीयाज खान सरदार खान (Imtiaz Khan) (वय-32) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तीयाज खान काही कामानिमित्ताने आला होता. त्याचवेळी एका दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी इम्तियाजवर गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या डोक्याला लागील. त्यामुळे तो जागेवरच कोसळला. गोळीबार करुन हल्लेखोर पळून गेले.

 

स्थानिक नागरिकांनी इम्तियाजला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. इम्तियाज हा मेकॅनिकल इंजिनिअर (Mechanical engineer) होता. तो पुसद येथील अरुण ले आऊट येथे राहत होता. त्याच एस आरएसी मोटार वर्क अँड ऑटो गॅरेजचा व्यवसाय आहे. घटनेची माहिती मिळताच वसंतनगर पोलीस ठाण्यातील (Vasantnagar Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

इम्तियाज खान याच्यावर कोणत्या कारणामुळे गोळीबार करण्यात आला, याचा शोध पोलिस घेत आहे.
मयत इम्तियाज याच्यावर आर्म अॅक्ट (Arms Act) आणि वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत (Wildlife Conservation Act) गुन्हा दाखल आहे.
त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीतून हा गोळीबार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस याचा देखील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Yavatmal Crime | gun firing by two youth young man shot dead in pusad in yavatmal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maval News | दुर्दैवी ! बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी धावला बाप, दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू

Nalasopara Crime | नालासोपाऱ्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2.5 लाखांचे कंडोम जप्त; एक तृतीयपंथी अन् तिघींची सुटका

Pune Crime | कोंढव्यात टोळक्याकडून 2 तरुणांवर कोयत्याने वार, एकाला अटक