Yavatmal Crime News | प्रियकराने धोका दिल्याने प्रेयसीची विष प्राशन करून गर्भातील बाळासह आत्महत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – Yavatmal Crime News | यवतमाळ जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणीने प्रियकराने धोका दिल्यानंतर विष पिऊन आत्महत्या केली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे हि तरुणी गर्भवती होती. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना वणी तालुक्यातील कळमना या गावात घडली आहे. श्वेता (वय 21) असे या मृत तरुणीचे नाव आहे तर सचिन रमेश नवले (वय 30) आरोपी प्रियकराचे नाव आहे. सचिन रमेश नवले याच्याविरोधात शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्वेताच्या मृत्यूप्रकरणी अटक केली आहे. (Yavatmal Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळमना येथील विवाहित असलेल्या सचिनने गावतच राहणाऱ्या श्वेतास लग्नाचे आमीष दाखवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. श्वेतादेखील त्याच्या प्रेमात अडकत गेली. यानंतर श्वेताताने सचिन म्हणेल तेव्हा आपले सर्वस्व त्याला अर्पण केले. गेल्या दोन वर्षांपासून सचिन तिचे शोषण करत होता. यातूनच श्वेता गर्भवती राहिली. सचिनच्या प्रेमाचा अंकुर गर्भात वाढत असल्याने आणि सचिन विवाह करणार असल्याने श्वेता आनंदात होती. तिने आपण गर्भवती असल्याचे सचिनला सांगितले तेव्हा सचिनने हात वर केले. श्वेताने लग्नाचा हट्ट धरला, मात्र सचिनने लग्नास नकार दिला. (Yavatmal Crime News)

या घटनेमुळे श्वेताला मोठा धक्का बसला. त्यामुळे आता गर्भातील जीवाचे काय होईल,
या भीतीने श्वेता निराश झाली आणि त्याच नैराश्यातून तिने 14 फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी
राहत्या घरी विष प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने श्वेताला चंद्रपूर येथील
सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी श्वेता आठ महिन्यांची गर्भवती असल्याची
माहिती कुटुंबीयांना दिली तेव्हा कुटुंबियांनादेखील मोठा धक्का बसला.
अति विष प्राशनामुळे बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता.
त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी श्वेताचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी कळमना येथे श्वेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर श्वेताच्या वडिलांनी आरोपी सचिन नवले याच्याविरोधात तक्रार दाखल केली. श्वेताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिन नवले याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :-  Yavatmal Crime News | poison life with the unborn child love story suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Koregaon Crime News | सोने घडवण्याच्या बहाण्याने ३१ लाखांचा ऐवज घेऊन कारागीर फरार; कोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल

Pune Pimpri Chinchwad Crime | महिलेचा विनयभंग करत वडिलांना मारहाण, आरोपीला अटक; चाकण परिसरातील घटना