Yavatmal Crime News | नुकतीच बदली होऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Yavatmal Crime News | काही दिवसांपूर्वीच बदली (Police Transfer) झाल्याने आणि गावाकडून येणंजाणं अवघड होत असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने शहरात रूम घेतली. काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु असताना सोमवारी या पोलीस कर्मचाऱ्याचा (Police Constable) हॉटेलमध्ये मृतदेह आढळून (Yavatmal Crime News) आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मांगीलाल नामदेव चव्हाण Mangilal Namdev Chavan (वय-34 रा. शेलू बु, ता. पुसद) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. चव्हाण यांचा मृतदेह (Dead Body) यवतमाळ शहरातील मकरंद हॉटेलमध्ये आढळून आला. ते यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात (Yavatmal City Police Station) कार्यरत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मांगीलाल चव्हाण हे वडगाव जंगल पोलीस ठाण्यात (Vadgaon Jungle Police Station) कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली यवतमाळ शहरात झाली होती. गावाला दररोज जाणे शक्य नसल्याने ते शहरातील दत्त चौक परिसरात असलेल्या मकरंद हॉटेलमध्ये रुम घेऊन राहत होते. सोमवारी सकाळी मंगिलाल हे हॉटेलमधील रुममध्ये मृतावस्थेत आढळून आले. (Yavatmal Crime News)

घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलीस ठाण्यातील (Avdhut Wadi Police Station) पोलीस अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, या अवधुतवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Yavatmal Crime News | police contable mangilal chavhan ends life

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना