Yavatmal Crime News | यवतमाळ हादरलं! चारित्र्यच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Yavatmal Crime News | एकदा का मनात संशयाची पाल चुकचुकली तर त्याचे परिणाम काय होतील हे काही सांगता येत नाहीत. अशीच एक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. यामध्ये चारित्र्यच्या संशयावरून पतीने आपल्या आपल्या भावासोबत मिळून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Yavatmal Crime News)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
ज्योस्त्ना निलेश देठे (वय 28, रा. पिंपरी बुटी) असे मृत महिलेचे नाव आहे. निलेश देठे (वय 35) आणि नितेश देठे ( वय 32 वर्ष, दोन्ही रा. पिंपरी बुटी ) असे आरोपी पती आणि दिराचे नाव आहे. यवतमाळ तालुक्यातील पिंपरी बुटी येथे गुरूवारी १६ फेब्रुवारीला संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. राळेगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ज्योस्त्ना हिचा सात वर्षांपूर्वी रिती रिवाजाप्रमाणे पिंपरी बुटी येथील निलेश देठे याच्यासोबत विवाह झाला होता. तेव्हापासून पती-पत्नी दोघेही सोबत राहत होते. यादरम्यान गुरुवारी जोस्त्ना ही घराशेजारी राहणाऱ्या मुलासोबत बोलताना पती निलेशला आढळून आली. यानंतर निलेशने संशय घेत पत्नी जोस्त्ना हिच्याकडे त्या मुलाबद्दल विचारपूस केली. मात्र, ती काहीही सांगायला तयार नव्हती. यानंतर पती निलेशने रागाच्या भरात तिला मारहाण केली. यानंतर त्याने आपल्या मेव्हण्याला फोन करून तिला घेऊन जाण्यास सांगितले अन्यथा जिवानिशी मारून टाकेल अशी धमकी दिली. (Yavatmal Crime News)

यादरम्यान रात्रीच्या सुमारास निलेश आणि त्याचा भाऊ नितेश दोघांनी जोस्त्ना हिला दुचाकीवर बसवून हातगाव ते
पिंपरी मार्गावर असलेल्या जर्मन धरणाजवळ काठीने बेदम मारहाण केली.
दरम्यान, तिला राळेगावकडे घेवून जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जोस्त्ना हिचा भाऊ विठ्ठल तिखट (रा. रानवड ता. राळेगाव) याने पोलिसांत तक्रार दाखल केली.
वडगाव जंगल पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वडगाव जंगल ठाणेदार पवन राठोड, पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे यांनी आरोपी पतीसह त्याचा भावाला अटक केली आहे.
या प्रकरणी आरोपींना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणेदार पवन राठोड या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Yavatmal Crime News | suspecting her character husband brutally beat his wife incident at pimpri buti in yavatmal taluka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhumi Pednekar | भूमीच्या ‘त्या’ लूकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले – ‘कोणीतरी हिला चांगला डिझाईनर द्या….’

Pune News | कैद्यांना नातेवाईकांशी महिन्यातून 3 वेळा बोलता येणार, कारागृह प्रशासनाचा निर्णय

Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन