Yavatmal Crime | यवतमाळमध्ये पोलीस हवालदाराची आत्महत्या, पोलीस अधीक्षकांवर त्रास दिल्याचा आरोप; चिठ्ठीत CBI चौकशी करण्याची मागणी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Yavatmal Crime | वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका पोलीस हवालदाराने (जमादार) गळफास घेऊन आत्महत्या (Police Havaldar Suicide) केल्याची घटना यवतमाळमध्ये (Yavatmal Crime) घडली आहे. विष्णू कोरडे Vishnu Korde (वय – 54) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोरडे हे बिटरगाव पोलीस ठाण्यात (Bittergaon Police Station) कार्यरत होते. त्यांनी आत्महत्येसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील (Yavatmal SP Dr. Dilip Bhujbal Patil) यांना जबाबदार धरले आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (Suicide Note) पोलीस अधीक्षक यांनी विनाकारण त्रास (Harassment) दिला. अपमानीत केले. तसेच गंभीर आजारी असताना बदलीची विनंती (Transfer) मान्य केली नाही. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे कोरडे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. याबाबत सीबीआय चौकशी (CBI Inquiry) करावी, असेही त्यांनी लिहून ठेवले आहे.

 

अधीक्षकांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी

कोरडे यांचा गंभीर अपघात (Serious Accident) झाल्याने त्यांचे शरीर दुखापतग्रस्त होते. त्यांची एका डेथ इन कस्टडी प्रकरणात चौकशी सुरु आहे. ही चौकशी पुसदमध्ये (Pusad) हस्तांतरित करावी तसेच बदली देखील पुसदमध्ये करावी, अशी त्यांची मागणी होती. परंतु पोलीस अधीक्षकांनी ती जाणीवपूर्वक बेदखल केली, असा आरोप कोरडे यांनी चिठ्ठीत केला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांवर गुन्हा (FIR) दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी विष्णू कोरडे यांचा भाऊ विलास कोरडे यांनी केली आहे. पोलीस अधीक्षकांच्या त्रासामुळे अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी त्रस्त असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राजू नजरधने (Former MLA Raju Najradhane) यांनी केला आहे.(Yavatmal Crime)

 

चिठ्ठीत नेमकं काय

विष्णू कोरडे यांनी पोलीस अधीक्षकांच्या विरोधात चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.
त्यांनी चिठ्ठीत लिहलं की, मला पोलीस अधीक्षकांनी खूप त्रास दिला. माझ्यासारख्या अनेक पोलिसांना ते त्रास देतात.
कर्मचाऱ्यांना नेहमी दबावाखाली ठेवतात. मी बदली मागितली. पण मला बदली दिली नाही.
माझी तब्ब्येत बरी नसताना मला त्रास दिला जात होता. शेवटी किती दिवस त्रास सहन करायचा. यामुळे शेवटचा निर्णय घेतला.
पण या प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कोरडे यांनी केली आहे.

 

Web Title :-  Yavatmal Crime  | Police Havaldar Suicide Case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा