यवतमाळमधील २३२ पोलिसांना पदोन्नती

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा पोलीस दलातील २३२ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पदोन्नती दिली. यामध्ये ३९ पीएसआय, ६१ हवालदार, १३२ नाईकांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्व सहायक फौजदाराच्या खांद्यावर स्टार लावण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले.

पोलिस

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c6896b51-d1c4-11e8-8b74-a93d160ce7f3′]

पदोन्नतीच्या या आदेशानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव यांनी सर्व सहायक फौजदारांच्या खांद्यावर स्टार तसेच पोलीस हवालदार व नाईक यांच्या खांद्यावर पदनिदर्शक फित चढवून कौतुक केले. मिळालेल्या जबाबदारीचे भान ठेवून समाजाच्या विकासासाठी कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. दिवाळीपूर्वी पदोन्नतीची भेट मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

[amazon_link asins=’935260640X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4578210-d1c4-11e8-a504-9b14acd92b39′]

आरोपींच्या कठोर शिक्षेच्या मागणीसाठी मोर्चा

यवतमाळ : आर्णी येथे घडलेल्या सामुहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल जैन समाज संघटनेसह विद्यार्थी, महिलांच्यावतीने शहरातील पाचकंदील चौक ते तिरंगा चौक या मार्गाने मोर्चा काढण्यात आला होता. मार्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आर्णी येथे घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेने संपुर्ण देश ढवळून निघाला होता. आरोपींना लवकरात लवकर जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. आर्णी येथे घडलेल्या या सामुहीक अत्याचाराच्या घटनेची तक्रार नोंदवण्यास उशीर करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास महिला एसडीपीओंकडे देण्यात यावा, संबंधीत प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करावे, या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देवून पिडीत कुटूंबीयांना न्याय द्यावा असे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना दिले.

धुळ्याजवळ पोलिसांच्या वाहनाला अपघात, ३ जण जखमी

जाहिरात