अरे देवा ! दारू विक्रीसाठी चक्क देव्हाऱ्याखाली दारूच्या टाक्या, पोलिस अधिकारीही चक्रावले

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – आज पर्यंत फक्त ऐकलं होत की, दारू भल्याभल्यांकडून काहीही करून घेऊ शकते आणि दारूसाठी लोकही काहीही करायला तयार होतात याचाच प्रत्त्येय आलाय यवतमाळच्या पोलिसांना. एका दारू विक्रेत्याने दारूची अवैध्यरित्या विक्री करता यावी आणि पोलिसांपासून सुरक्षित राहता यावे यासाठी घरातच दारू साठ्या साठी टाक्या बांधल्या आहेत.

दारू विक्रेत्याने आपल्या घरात भीमगत टाक्या बांधल्या आणि दारूची विक्री सुरु केली शिवाय टाक्या पोलिसांना दिसू नहे म्हणून त्यावर देवघर उभारले. यवतमाळ मधील जाम येथील सचिन इंगळे यांनी हा पराक्रम करून दाखवला आहे. घरात चक्क तीन फूट खोलीच्या टाक्या बांधून दारू विक्री सुरु करणाऱ्या सचिनला पोलिसांनी अटक केली आहे.

या टाक्यांमध्ये एक ताई प्लॅस्टिकची होती दारूचा वास येऊ नाही यासाठी सचिन स्वतः दारूचे ग्लास थुवून टाकत असे. आणि टाक्या पोत्यानी नीट पॅक करून ठेवत असे त्यामुळे दारूचा माग काढणं अवघड होत. वारंवार हे सगळं काढायला लागू नाही यासाठी सचिनने देव्हाऱ्याखालील टाकीत एक मोटार टाकून कुलर मधून त्याचा पाईप बाहेर काढला होता या मोटारीच्या साहाय्याने हवी तेवढी दारू तो काढू शकत होता. शिवाय दारू टाकीत भरण्यासाठी वेगळा पाईप होता.

पोलिसांनी कित्त्येकदा सचिनच्या घरी दाढी देखील टाकल्या मात्र पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागत असे. शेवटी सचिनची माहिती गुप्त पद्धतीने काढून त्याला पोलिसांनी जाळ्यात अडकवले आणि अटक केली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like