यवतमाळमध्ये भाजपाला धक्का ! जि.प. वर महाविकासचा झेंडा, शिवसेनेचा अध्यक्ष

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर महाविकासआघाडी तयार झाली. तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर भाजपला धक्के पे धक्का देताना दिसत आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडी झेंडा फडकला आहे. शिवसेनेच्या कालिंदा पवार यांची अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. याची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. संख्याबळ न जुळल्याने भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली.

महाविकासआघाडीचे 43 विरुद्ध भाजपचे 18 अशी चुरस निवडणुकीत पाहायला मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेने दोन सभापतीपद मागितले तर राष्ट्रवादीने एक उपाध्यक्षपद मागितलं. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव आहे. काँग्रेसने बांधकाम आणि महिला बालकल्याण ही दोन पदं मागितली होती. या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या सरकारमधील काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, कॅबिनेट मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादीचे मनोहर नाईक, शिवाजीराव मोघे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यावेळी भाजपकडून महाविकासआघाडीमधील नाराज सदस्यांना हेरण्याचे प्रयत्न करण्यात आले होते.

पक्षीय बलाबल
– शिवसेना 20
– भाजप 18
– काँग्रेस 12
– राष्ट्रवादी 11

एकूण- 61

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/