Yavatmal News । संशयिताचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू; संतप्त जमावाचा दारव्हा पोलीस ठाण्यावर हल्ला, 2 पोलिस जखमी (व्हिडिओ)

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Yavatmal News । पोलिसांच्या मारहाणीत एका संशयित आरोपीचा मृत्यू झाला आहे. यावेळी संतापलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यावरच हल्ला केला आहे. तसेच समस्त जमावाने पोलीस स्टेशनमधील (Police station) वाहनांवर दगडफेक केली आहे. या घटनेत दोन पोलीस शिपाई जखमी झाले. यावरून परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून आलीय. ही धक्कादायक घटना यवतमाळ (Yavatmal)  जिल्ह्यातील दारव्हा (Darwha) येथे घडली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

अधिक माहितीनुसार, दारव्हा (Darwha) येथे पोलिसांनी शेख इरफान शेख शब्बीरसह (Sheikh Irfan Sheikh Shabbir) अन्य दोघां तरुणांना गांज्याची विक्री करत असण्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं आहे. मात्र यानंतर इरफान संतप्त झाला आणि त्याने पोलिसांशी वाद घातला. तर, त्या नंतर इरफान याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात (Hospital) नेले असता त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहरातील काही तरुणांना झाली. या प्रकारामुळे एक गट आक्रमक झाला आणि त्यांनी पोलीस स्टेशनवर (Police station) आणि वाहनांवर दगडफेक केली आहे.

तसेच, तेथील एका पोलीस वाहनांवर देखील दगड मारण्यात आला. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी (Police personnel) जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांच्या मारहाणीत इरफानचा मृत्यू झाला, म्हणून काही जमाव संतप्त झाले आहेत. या घटनेमुळे शहरात चर्चा होत आहे. तसेच, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. शहरात Rcp पथक दारव्हा दाखल झाले असून तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : Yavatmal News । suspect dead in police beating angry mob attacks on police station at yavatmal

हे देखील वाचा

दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Modi Cabinet Expansion | नारायण राणे, प्रीतम मुंडे, शिंदेंसह संभाव्य मंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल

Movies Live Blog | दिलीपकुमार यांनी महात्मा गांधींच्या अनुयायांसोबत घालवली होती येरवडा कारागृहात रात्र; पुण्याशी होते त्यांचे ऋणानुबंद

Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच मोठी खळबळ ! केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा राजीनामा