पंचायत समितीच्या ‘सभापती’ निवडीवरून ‘भाजप-सेनेत’ राडा

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – आज यवतमाळमध्ये पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक होती. पंचायत समिती सभापती निवडीवरून आज (बुधवार दि 8 जानेवारी) भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले. हे दोन्ही नेते एकमेकांना भिडले. पंचायत समिती कार्यालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांची महाविकासआघाडी आहे. सभापती निवडीवरून भाजप-सेनेत चांगलाच राडा झाला.

राष्ट्रवादीचे सदस्य नरेश ठाकूर आणि शिवसेनेच्या नंदा लडके हे भाजपवासी झाले. यावरून आज पंचायत समितीत चांगलाच राडा झाला. भाजप जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांची आपापसात धक्काबुक्की झाली. यावेळी नंदा लडके यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंचायत समिती परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस या स्थितीवर लक्ष ठेवून होते.

महाविकासआघाडीतील दोन सदस्य भाजपवासी झाल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी भाजप विरूद्ध महाविसकास आघाडी सामना रंगला होता. यवतमाळ पंचायत समितीत शिवसेना 4, भाजप 2, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादी 1 असे सदस्य आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/