आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकास ठोकल्या बेड्या 

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन

यवतमाळ येथील आश्रमशाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सतीश जाधव असे अटक केलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलींच्या तक्रारीनंतर बाभूळगाव पोलिसांनी सतीश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4ce1d708-97d4-11e8-a5b1-7b968ba4e6b4′]
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाच्या या कृत्यानंतर घाबरलेल्या एका पीडित मुलीने आश्रमशाळा अधीक्षिकेकडे तक्रार केली. यानंतर तपास केला असता आणखी दोन मुलींसोबत हा प्रकार झाल्याचे समोर आले. यांनतर पीडित मुलींनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात सतीश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करत  गुन्हा दाखल केला.
दरम्यान, ज्या शिक्षकावर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आहे त्याच शिक्षकाने असे कृत्य केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट आहे.