यवतमाळ : एकाच वेळी महिलेने दिला चार मुलींना जन्म

यवतमाळ : पाेलीसनामा ऑनलाईन

वैद्यकीय क्षेत्रात जुळे होण्याच्या नोंदी अनेक आहेत. मात्र, तिळ्यांच्या नोंदी कमी आहेत. एकाचवेळी चार बाळांना जन्म देण्याचा प्रसंग तर विरळच. असाच एक प्रसंग यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका महिलेने तब्बल चार मुलींना जन्म दिला. रक्षाबंधनाच्यादिवशी या आईने चक्क चार मुलींना जन्म दिला असुन, मुली अाणि आई सुखरूप आहेत. राणी प्रमाेद राठाेड असे या महिलेचे नाव असुन, दारव्हा तालुक्यातील चाकणी या गावच्या त्या रहिवासी आहेत.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c6caa68-a93c-11e8-9a23-b1019cd093af’]

राणी राठोड या महिलेला 25 जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान डॉक्टरांनी काळजी घेण्यासाठी या महिलेला येथे थांबण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून पती-पत्नी दोघेही रुग्णालयात राहात होते. आज रविवारी दुपारी 12.30 वाजता चार मुलींना महिलेने जन्म दिला. महिलेची डिलिव्हरी सामान्य झाली आहे, तसंच आई आणि मुली सुखरुप असल्याचं डाॅक्टरांनी सांगितले आहे.

चार बाळांना एकाच वेळी जन्म देण्याचा प्रसंग दुर्मिळच….एका कोटीमागे एक घटना… एका मातेने चार मुलींना जन्म दिल्याच्या नोंदी  वैद्यकीय जनरलमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला असता एक कोटी प्रसुतीमागे एक अशी घटना घडत असल्याचे निदर्शनात आले आहे.

इतर बातम्या