शेजाऱ्यांवर गोळीबार करत चोट्यांनी ठोकली ‘धूम’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये चोरट्यांनी शेजाऱ्यावर गोळीबार करत पळ काढल्याची घटना घडली आहे. हा प्रकार पुसद शहरातील समतानगरमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले. चोरटे शेजारील जिल्ह्यातील असण्याची शक्यता पोलसांनी वर्तवली आहे.

पुसद शहरातील समतानगर येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. रात्री घरी आले असता घराच्या बाहेरील दिवा बंद तर घरातील दिवा सुरु असल्याचे दिसले. घरामध्ये चोरटे असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना उठवले. त्यावळी चोरटे घरात होते. कुणीतरी आल्याची कुणकुण लागताच चोरटे सावध झाले. आपल्याला घरात कोंडून पकडून दिले जाईल याची भीती चोरट्यांना वाटली.

आपण पकडले जाऊ या भीतीने चोरट्यांनी घराकडे डोकावणाऱ्यांवर थेट गोळीबार केला. तसेच सर्वांच्या समोरून तेथून पळून गेले. चोरट्यांनी घरातून नेमका किती रुपयांचा ऐवज चोरून नेला हे अद्याप समजू शकले नाही. मात्र चोरट्यांनी गोळीबार केल्याने पुसद शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी सकाळी पुसद येथे येऊन घटनास्थळी भेट दिली. पुसद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com

You might also like