Year Ender 2020 : यावर्षी ‘या’ ख्यातनाम व्यक्तींनी कमावले नाव, भारतीय वंशाचा डंका, ‘सबसे आगे हिंदुस्तानी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्ष आता येतच आहे. मागील वर्ष अनेक बाबतीत अनेक ख्यातनाम व्यक्तींच्या नावावर राहिले. कोरोना महामारी संकटात या व्यक्तींनी जगभरात नाव कमावले. यामध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तींची संख्या सुद्धा जास्त होती. भारतीयांनी यावर्षी आपला डंका वाजवला. यामध्ये मुकेश अंबानी, कमला हॅरिस, सुंदर पिचाई, सत्या नाडेला, निक्की हेली, इंदिरा नूई यांच्यासह अनेकजण होते. भारतीयांशिवाय अनेक इतर व्यक्तींनी सुद्धा नाव कमावले.

जो बायडेन यांनी दिले हे आश्वासन
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय स्वाभाविक होताच, परंतु याची कल्पना नव्हती की, ते इतक्या नाट्यमय परिस्थितीत संयुक्त राज्य अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष होतील. वैचारिक विभाजनाच्या या युगात अमेरिकेच्या नागरिकांना बायडेन यांची आश्वासने चांगली वाटली. पुढील चार वर्ष बायडेन यांना काही मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. बायडेन म्हणतात – अमेरिकेचा रूबाब आता तसा राहिला नाही जसा अगोदर होता. त्यांनी हाच रूबाब पुन्हा आणण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतीय वंशाचा डंका, सबसे आगे हिंदुस्तानी
सुंदर पिचाई, सत्या नाडेला, निक्की हेली, इंदिरा नूई, शांतनु नारायण, अजय बंगा… जागतिक पटलावर नक्षत्र बनलेल्या मुळ भारतीय वंशाच्या व्यक्तींची ही यादी खुप मोठी आहे. प्रत्येक वर्षी नवीन तारे नक्षत्रांच्या या यादीत जोडले जाऊन भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत. राजकारण, अर्थशास्त्र, आयटी, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन यासारख्या क्षेत्रात अनेकांनी नेत्रदिपक यश मिळवले आहे. जगातील 210 देशांमध्ये 3.21 कोटी मुळ भारतीय वंशाचे लोक आपले कौशल्य आणि कर्त्वृत्वाने भारतमातेला दैदीप्यमान करत आहेत.

मुळ भारतीय वंशाचे ऋषि सुनक, प्रीति पटेल आणि आलोक शर्मा सारखे चेहरे बोरिस जॉन्सन यांच्या कॅबिनेटची शोभा वाढवत आहेत. शिवाय ते देशाला अडचणीतून बाहेर सुद्धा काढत आहेत. नुकतेच न्यूझीलँडमध्ये खासदार बनलेले मुळ भारतीय वंशाचे गौरव शर्मा यांनी जेव्हा संस्कृतमध्ये शपथ घेतली तेव्हा भारताची मान अभिमानाने उंचावली. असेच एक नाव म्हणजे संदीप कटारिया. कटारिया यांना नुकतेच बाटा कंपनीने आपले ग्लोबल सीईओ बनवले आहे. 126 वर्षांच्या इतिहासात एखाद्या भारतीयाला हे पद या कंपनीत मिळणे भारतासाठी अभिमानास्पद आहे.

मुकेश अंबानी भारतीय उद्योजगकतेची अंतरराष्ट्रीय ओळख
यावर्षी मुकेश अंबानी यांनी भारतीय उद्योजकतेला अंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख दिली. जगभरात अर्थव्यवस्था कठिण स्थितीतून जात असताना त्यांच्या कुशल नेतृत्वात रिलायन्सने उंच भरारी घेतली आहे. अशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी 2020 साल मालामाल करणारे ठरले. ब्लूमबर्ग इंडेक्स आणि फोर्ब्सनुसार, ते जगातील दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्या, विशेषकरून जियो प्लॅटफॉर्ममध्ये भागीदारी खरेदी सुरू केली. यामध्ये सर्वात चर्चेत होती फेसबुक आणि गुगलमधील भागीदारी.

मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स रिटेलमध्ये सुद्धा सिल्व्हर लेक सारख्या मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केल्याने ती चर्चेत होती. यामुळे यावर्षीच्या अखेरीस रिलायन्सच्या शेयरमध्ये सुमारे दिडशे टक्केची विक्रमी वाढ नोंदली गेली आणि कंपनीशी संबंधीत गुंतवणुकदार बाजारात महामारी असतानाही मालामाल झाले. दूरसंचार शिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजचा उर्जा, पेट्रो-रसायन, वस्त्र इत्यादी क्षेत्रात सुद्धा मोठा उद्योग प्रस्तापित झाला आहे. रिलायन्स फ्रेश आणि रिटेलचे स्टोअरसुद्धा आता बहुतांश शहरात मिळतील.

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी 2021 च्या मध्यावर भारतात जिओ 5 जी लाँच करण्याची घोषणा केली आहे. सध्या त्यांची संपत्ती 80 अरब डॉलर म्हणजे 5,500 अरब रुपये आहे. असे मानले जाते की, त्यांच्या एकट्याच्या संपत्तीने भारताचा वीस दिससांचा खर्च चालू शकतो. आयपीएलची प्रसिद्ध टीम मुंबई इंडियन्सच्या मालकीन आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता त्यांना प्रेमाने मुकु म्हणतात. वर्ष सरत असताना मुकेश अंबानी आणि नीता यांच्या घरी आणखी एक खुशखबर आली. दोघे आजी-आजोबा झाले आहेत.