उस्मानाबाद लोकसभा : भाजप इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी 

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – तीन जिल्हयातील प्रदेश जोडून तयार झालेला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ मागच्या खेपेला युतीत शिवसेनेने लढवला आणि जिंकला. या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. पद्मसिंह पाटील यांचा २ लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. शिवसेनेचा खासदार या मतदारसंघात असल्याने परवा झालेल्या युतीच्या घोषणेनुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार आहे. म्हणून भाजप मधील इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.

सुनिल कांबळे आणि हेमंत रासने स्थायी समिती अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार 

२०१४ साली झालेल्या निवडणुकी पासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपने आपले चांगलेच पाय रोवले आहेत. मतदारसंघाचा भाग असणाऱ्या बार्शीचे राजेंद्र राऊत हे सध्या भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्या येण्याने भाजपच्या बाजूने चांगलेच संघटन मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात आलेले डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी उमेदवारीसाठी चांगलेच दंड थोपटले होते. त्याच प्रमाणे सुधीर पाटील देखील भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. तर बार्शीचे उद्योगपती राजेंद्र मिरगणे हे मागील निवडणुकीत शिवसेनेतून तर या निवडणुकीत भाजपातून लढण्यासाठी इच्छुक होते पण परवा झालेल्या युतीने त्यांचे देखील मनसुबे उधळून लावले आहेत. या तिघांपैकी एक तरी व्यक्ती अपक्ष उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

उस्मानाबाद  लोकसभेचे असे तर विधानसभेचे देखील याहून वेगळे नाही. कारण तुळजापूर सोडला तर इतर कोणताच मतदारसंघ भाजपसाठी सुटणार नाही.उर्वरित तिन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे राहणार आहे. उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातून विधानसभेची तयारी करणाऱ्या  भाजपच्या सुरेश पाटील यांची हि युतीने पंचाईत केली आहे. भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून भूम पालिकेचे नगरसेवक संजय गाढवे यांना भाजपने पक्षात आणले आहे. त्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षाकडे हा मतदारसंघाच उपलब्ध नसणार आहे. तर गतवेळी विधानसभेला उमरग्यातून भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढून चांगले मताधिक्य कमावलेल्या कैलास शिंदे यांची देखील युतीने पंचाईत केली आहे. एकंदरच उस्मानाबाद जिल्ह्यातील नवख्या भाजप नेत्यांची उमेदवारी वरून चांगलीच पंचाईत झाली आहे.

Loading...
You might also like