संतापजनक ! मित्राला झाडाला बांधून १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विरारमध्ये नातेवाईकांच्या घरी जाणाऱ्या १५ वर्षीय मुलीला तिच्या मित्रासह दोन अनोळखी व्यक्तींनी निर्जन स्थळी नेत मित्राला झाडाला बांधून मुलीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान मुलीने घरी आल्यावर हा प्रकार वडीलांना सांगितला. त्यानंतर बुधवारी तिच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अनोळखी व्यक्तींवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलगी सोमवारी रात्री आठच्या सुमारास तिच्या नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी तिला तिचा १६ वर्षीय शाळकरी मित्र भेटला. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या, त्यांनी दोघांना ओढत जवळच्या शाळेजवळील निर्जन स्थळी नेले. त्यानंतर एक जाडजूड आणि एक पातळ बांध्याचा अशा दोघांनी तिच्या मित्राला झाडाला बांधले. आणि आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांनी तिला झाडाच्या मागे नेऊन तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ते तिला तसेच सोडून निघून गेले. पिडीत मुलगी कशीबशी झाडीतून बाहेर आली. त्यानंतर झाडाला बांधलेल्या आपल्या मित्राला सोडवले आणि घरी आली. त्यानंतर तिच्या वडीलांना ही हकिकत सांगितली. तेव्हा त्यांनी मंगळवारी पोलिसांत धाव घेतली.

अत्याचार करणारे रिक्षाचालक असल्याचा संशय

पिडीत मुलीने पोलिसांना दोघाही अत्याचार करणाऱ्यांचे वर्णन सांगितले आहे. दोघांनीही रिक्षाचलाकांसारखा खाकी रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता. तसेच एकाच्या खिशावर रिक्षाचालकांच्या बॅजसारखा बॅज लटकत होता. त्यांनी कोणतंही वाहन पाहिलं नाही. दरम्यान पोलिसांनी संशयावरून परिसरातील रिक्षाचाकलांची चौकशी सुरु केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like