Vrishchik/Scorpio Rashifal 2021 : वृश्चिक राशीसाठी 2021 अतिशय शुभ, नोकरी-व्यापारात भरपूर प्रगती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लवकरच 2021 सुरू होणार आहे आणि हे वर्ष वृश्चिक राशीसाठी अतिशय खास असणार आहे. ज्योतिषाचार्यांनुसार, नव्या वर्षात वृश्चिक राशीवाल्यांना धन, व्यापारात भरपूर लाभ होईल. नोकरीत प्रमोशनचे योग सुद्धा आहेत. आरोग्य, शिक्षण, करियर आणि आर्थिक बाबतीत 2021 वृश्चिक राशिवाल्यांसाठी कसे असेल ते जाणून घेवूयात…

सामान्य

यशाच्या नव्या शक्यतांसोबत येणारे 2021 संपर्क आणि संबंधाचा संकेत आहे. छोट्या अंतराचे प्रवास होतील. धाडस, पराक्रम वाढलेला राहील. ‘कॅलक्युलेटिव्ह रिस्क‘ ला सक्सेस मंत्र बनवून पुढे वाटचाल करा. आत्मविश्वास वाढलेला राहील. महत्वपूर्ण कामे सुरूवातीच्या महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक उपक्रमांशी जोडले जाल. मोठ्यांच्या तुलनेत छोट्यांशी ताळमेळ चांगला राहील. कौटुंबिक प्रकरणे मेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्तर्रार्धात गुरुचे राशीपासून चतुर्थ भावातील भ्रमण अंशता अस्वस्थता वाढवेल.

रिलेशनशिप

प्रेमसंबंध साधारण राहतील. अतिनम्रता अथवा अतिउत्साह दोन्ही टाळा. संवाद चांगला राहील. विचार मांडण्यासाठी योग्य वेळेची वाट पहा. महत्वाची मंगलकार्य एप्रिलपर्यंत पूर्ण करा. कुटुंबियांशी मतभेद वाढू शकतात. मित्रांशी मोठेपण कायम राखा.

व्यापार

कामकाज अपेक्षेप्रमाणे राहील. निसंकोच पुढे वाटचाल करा. योजना यशस्वी होतील. पूर्वार्धात भाग्य प्रबळ असल्याने प्रलंबित कामांना गती मिळेल. अडथळे आपणहून दूर होतील. उत्तर्रार्धात व्यवस्थापन प्रशासनाचे सहकार्य यश देईल. प्रस्ताव स्वीकृत होतील. विस्ताराच्या योजनांवर विचार करू शकता.

नोकरी

नोकरदार लोकांना ओळख मिळण्याचा काळ आहे. शासन, समाजाकडून मान-सन्मान मिळेल. पद, प्रतिष्ठा, पदोन्नतीची संधी येईल. जॉबचा शोध पूर्ण होईल. जबाबदारी वाढू शकते. स्थानांतरणाचा आनंदाने स्वीकार करा. चांगला प्रस्ताव मिळू शकतो.

आरोग्य

आरोग्य चांगले राहील. रुटीन चांगले ठेवा. व्यक्तिगत प्रकरणांवर फोकस राहील. मनोबल वाढलेले राहील. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली तर मानसिक प्रकरणे आणखी सांभाळाल. पूर्वार्धात सक्रियता आणि यश मिळाल्याने आनंदी राहाल. उत्तरार्धात धैर्याने रहा. वर्षभर सुंदर आरोग्याचे संकेत आहेत.

एज्युकेशन

शिक्षणाच्या दृष्टीने हे वर्ष परीक्षा घेणारे आहे. अभ्यास, अध्यापनात अतिरिक्त जास्त वेळ देण्याची गरज आहे. टाइम टेबल आणि शिस्तीचे पालन करत राहाल. पूर्वार्धात परिणाम अपेक्षेपक्षा चांगले मिळतील. शालेय विद्यार्थी जास्त चांगली कामगिरी करतील. उच्चशिक्षित गुरुजनांचा सल्ला घेऊन वाटचाल करणे लाभदायक ठरेल.