विराटला डेट करण्याच्या चर्चांवर तमन्ना म्हणते … 

मुंबई :वृत्तसंस्था – भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत लग्न गाठ बांधली पण त्यांचं लग्न होण्याआधी विराटच्या आयुष्यात दोन अभिनेत्री होत्या. त्यापैकी एक म्हणजे ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया. २०१२ मध्ये तमन्ना आणि विराट एकमेकांना डेट करत असलेल्या चर्चांना उधाण आले होते. त्या चर्चांवर आता बऱ्याच वर्षांनी तमन्नाने मौन सोडलं आहे.
२०१२ मध्ये एका मोबाइलच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि तमन्नाची भेट झाली होती .त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. मात्र अवघ्या काही महिन्यांतच दोघांचं ब्रेकअप झालं. ब्राझिलिअन मॉडेल इजाबेलमुळे हे ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं.
एका मुलाखतीत तमन्नाने विराटसोबत काम केल्याचा अनुभव सांगितलं आहे.‘आम्ही दोघं २०१२ मध्ये एका शूटिंगदरम्यान भेटलो होतो. पण त्यानंतर पुन्हा कधीच आमची भेट झाली नाही. फार काही आम्ही बोललो पण नाही. शूटिंगदरम्यान आम्ही क्वचित चार शब्द एकमेकांशी बोललो होतो. पण मी हे विश्वासाने सांगू शकते की ज्या अभिनेत्यांसोबत मी काम केलंय त्यापैकी विराट सर्वांत चांगला व्यक्ती आहे,’ असं तिने सांगितलं.
अनुष्का आणि विराटची पहिली भेटसुद्धा एका जाहिरातीदरम्यान झाली होती. त्यांनतर दोघांची मैत्री वाढली आणि काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले.
Loading...
You might also like