‘ये है चाहतें’ मध्ये पहिल्यांदाच ‘निगेटिव्ह’ रोलमध्ये दिसणार ऐश्वर्या, भूमिकेच्या तयारीबद्दल सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री ऐश्वर्या सखुजा पुन्हा एकदा टीव्हीच्या जगात कमबॅक करणार आहे. परंतु यावेळी तिचा खतरनाक अवातर पाहायला मिळणार आहे. एकता कपूरची मालिका ये है चाहतेंमध्ये ऐश्वर्या वॅम्पच्या भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार ये है मोहब्बतेंच्या स्पिन ऑफमध्ये ऐश्वर्या वॅम्प बनून येणार आहे. ऐश्वर्या पहिल्यांदाच टीव्हीवर निगेटीव रोलमध्ये दिसणार आहे.

एका मुलाखतीत ऐश्वर्याला विचारण्यात आलं की, तिनं यासाठी कशी तयारी केली तेव्हा ऐश्वर्या म्हणाली, “मी बालाजीच्या शोसाठी अनेक ऑडिशन दिले आहेत. जेव्हा निगेटीव रोलसाठी ऑडिशन दिलं तेव्हा मला सांगण्यात आलं की, मी पॉजिटीव दिसते. जेव्हा मला रोल मिळाला तेव्हा मी कारण विचारलं. ते म्हणाले की, शेवटी तुला कळेल आम्ही तुझी निवड का केली. नंतर मला समजलं की, त्यांना ऑडियंसला सरप्राईज करायचं होतं.”

पुढे ती म्हणते, “मी नेमकी कशी तयारी करू याचा विचारच करत होते अशात मला माझ्या टीमनं खूप मदत केली. दोन लाईन निगेटीव बोलल्यानंतर मी पुन्हा सवयीप्रमाणे पॉजिटीव झोनमध्ये जात होते. परंतु माझ्याकडे अशी माणसं आहेत जी मला मदत करत आहेत.”

कधी होणार प्रसारण ?

ये है चाहतें ही मालिका ये है मोहब्बतेंची स्पिन ऑफ आहे. आज रात्री म्हणजेच 19 डिसेंबर 2019 रोजी हा शो सुरु होणार आहे. या मालिकेत सरगुन कौर आणि अबरार काजी लिड रोलमध्ये आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/