‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली लग्नगाठ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने ४ जूनला गुपचूप लग्नगाठ बांधली. आता ‘ये जवानी है दीवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्माही evelyn sharma गूपचूप लग्नबंधनात अडकली आहे. एवलीनने evelyn sharma ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा डेंटल सर्जन डॉ. तुषान भिंडीसोबत विवाह केला. ब्रिस्बेन येथे गत १५ मे रोजी हा विवाह सोहळा पार पडल्याचे कळते. या विवाह सोहळ्याचे काही फोटो आत्ता कुठे समोर आले आहेत.

एवलीनने evelyn sharma स्वतः हे मान्य केलं की तिने ऑक्टोबर २०१९ रोजी साखरपुडा केला होता.
साखरपुड्यानंतर दोघांचाही एकमेकांना किस करतानाचा फोटो समोर आला होता.
सिडनीच्या हार्बर ब्रीजसमोर दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
आता एवलीन व तुषान यांनी लग्न केले. बेस्ट फ्रेन्डसोबत लग्न, आयुष्यात यापेक्षा आनंददायी अनुभव दुसरा कुठलाही नाही.
आम्ही एकमेकांसोबत आयुष्य घालवण्यासाठी उत्सुक आहोत, असे एवलीनने सांगितले. लग्नसोहळ्यात एवलिनने व्हाईट कलरचा गाऊन घातला होता तर तुषानने ब्ल्यू सूट निवडला होता. कोरोनामुळे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.
एवलिनच्या लग्नात तिची आई सुद्धा हजर नव्हती.
वेडिंग सेरेमनी अगदी साधेपणाने पार पडली.
मात्र यानंतर एक ग्रॅण्ड सेरेमनी करण्याचे दोघांचे प्लानिंग आहे.

२०१२ मध्ये ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री एवलिन एवलिन शर्माचा जन्म जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झाला.
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी युकेमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील भूमिकेनंतर एवलिन प्रकाशझोतात आली.
मैं तेरा हिरो आणि जब हॅरी मेट सेजल या सिनेमातही ती दिसली होती. एवलिन व तुषानची पहिली भेट २०१८ साली झाली होती. दोघेही एका ब्लाइंट डेटवर एकमेकांना भेटले होते. दोघांच्या मित्रांनी ही ब्लाइंड डेट अरेंज केली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. २०१९ मध्ये सिडनीच्या हार्बर ब्रीजवर गुडघ्यावर बसून तुषानने एवलिनला प्रपोज केले होते.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)