‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम दिव्या भटनागररची प्रकृती ‘गंभीर’, ‘कोरोना’ची बाधा झाल्यापासून व्हेंटिलेटरवर

पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री दिव्या भटनागर हिची प्रकृती सध्या गंभीर आहे. कोरोनाची लागण झाल्यापासून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिने इंस्टाग्रामवर एका व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यात तिने लिहिले होते, हाय माझी इंस्टाग्राम फॅमिली. माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करा. तुम्हाला सर्वांना माझे प्रेम.

इंस्टा स्टोरीतील फोटोत दिव्या भटनागर हॉस्पिटलच्या बेडवर दिसून येत आहे. तिच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क आहे. सध्या दिव्याची आई तिची काळजी घेण्यासाठी दिल्लीहून आली आहे. दिव्याच्या आईने सांगितले की, व्याला मागील सहा दिवसांपासून खूप ताप होता. तिला अजिबात बरे वाटत नव्हते. त्यामुळे मी दिल्लीहून येथे आली आहे. दिव्याची ऑक्सिजन पातळी चेक केली तेव्हा ती खालावली होती. आता ती व्हेंटिलेटरवर आहे आणि तिची प्रकृती नाजूक असून तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
दिव्याची आई म्हणाली की, दिव्याचा नवरा फ्रॉ़ड निघाला आहे. तो तिला सोडून गेला असूून त्याने तिच्या तब्बेयतीलबद्दल एकदाही विचारपूस केली नाही. दिव्या तेरा प्यार हूॅं या मालिकेत काम करीत होती. मालिकेची टीम तिला मदत करणार आहे. तसेच दिव्याच्या भावाने शो च्या प्रोडक्शन हाऊसला संपर्क केला होता. ते दिव्याच्या उपचारासाठी प्रयत्न करणार आहेत.

You might also like