‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहेना कुमारी सिंहचा कोरोना रिपोर्ट Negative ! 1 महिन्यानंतर जिंकली ‘महामारी’विरोधातील लढा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतील कीर्ती अर्थात मोहेना कुमारी सिंह हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 1 महिना कोरोनासोबत लढा दिल्यानंतर अभिनेत्रीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. आता ती एकदम बरी झाली आहे.

कोरोनातून बरी झाली मोहेना कुमारी सिंह

मोहेनानं इंस्टावरून एक पोस्ट शेअऱ करत सांगितलं की, ती आता कोरोनामुक्त झाली आहे. मोहेनानं एक फोटो शेअर करत लिहिलं की, “अखेर एका महिन्यानंतर आम्ही कोरोना निगेटीव्ह आढळलो आहोत. आम्ही सर्वजण एम्स ऋषीकेशमधील सर्व डॉक्टर्स आणि हेल्थ प्रोफेशनल्सचे आभार मानतो.”

मोहेना म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात अद्भुत अशा डॉक्टर, नर्स आणि मेडिकल प्रोफेशनल्सला भेटले आहे. लोकांचा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांची आभारी आहे. मी आशा आणि प्रार्थना करते की, सर्व डॉक्टर्स प्रत्येक ग्रुप आणि धर्मातील लोकांना अशीच मदत करो. लोकांना डॉक्टरांवर खूप विश्वास असतो. सर्व निस्वार्थी, मेहनती, इमानदार डॉक्टरांना नॅशनल डॉक्टर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा.”

मोहेनाच्या खासगी आुयष्याबद्दल बोलायचं झालं तर 2019 मध्ये तिनं सुयश सोबत लग्न केलं होतं. तिनं ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेला राम राम ठोकला असून सध्या ती उत्तराखंड मध्येच आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे.