‘सास भी कभी बहू थी’ मधील अभिनेता समीर शर्माची आत्महत्या, पंख्याला लटकलं होतं शरीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातून मनोरंजन विश्व सावरलं नसताना आता आणखी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. टीव्ही अभिनेते आणि मॉडेल समीर शर्मानं बुधवारी रात्री मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. मलाड येथील रहात असलेल्या समीरचा मृतदेह किचनमधील सिलिंग फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

मलाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरनं मलाड मधील घरं फेब्रुवारीमध्ये भाडे तत्वावर घेतले होते. बुधवारी रात्री इमारतीच्या वॉचमननं समीरचा मृतदेह पाहिला आणि त्याच्या शेजाऱ्यांना याबाबत कळवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीरनं दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी. अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही.

पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. समीरनं प्रसिद्ध मालिका कहानी घर घर की, क्यूं की सांस भी कभी बहू थी, रिश्ता क्या केहलाता है, अशा प्रसिद्ध मालिकांमधून काम केले होते. दरम्यान, समीर फोन उचलत नसल्याने त्याच्या पत्नीला संशय आला. तिने त्याच्या मित्रांना फोन करून समिर फोन उचलत नसल्याचे सांगितले. तसेच मित्रांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like