पिवळ्या साडीतील ‘त्या’ महिला ऑफिसरच्या फोटोंमुळे सोशलवर ‘धूमाकूळ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सोशल मिडीयावर एखादे चांगले फोटो व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अशाच प्रकारे एका पिवळ्या साडीतील आणि हातात बॅलेट बॉक्स घेऊन ‘बोल्ड’ अंदाजात जाणाऱ्या एका महिला पोलींग ऑफिसरच्या फोटोंनी सध्या धूमाकूळ घातला आहे. फेसबुकवर अनेकांनी या महिलेचे फोटो व्हायरल केले आहेत.तर सोशल मिडीयावर सध्या याच फोटोंचा बोलबाला आहे.

 

लोकशाहीचा उत्सव सध्या सुरु आहे. या लोकसभा निवडणूकीच्या उत्सवात एकीकडे राजकीय नेत्यांच्या एकमेकांवरील शेरेबाजी, वादग्रस्त विधानं यांची चर्चा आहे. परंतु या चर्चांमध्ये या रिटर्निंग ऑफिसरचीच चर्चा फेसबुकवर सुरु आहे.

फेसबुकवर एकाने या महिलेचे फोटो पोस्ट करत ती मिसेस जयपूर ‘नलीनी सिंह’ असून ती असलेल्या पोलींग बुथवर १०० टक्के मतदान झालं असणार. अशीही प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानावेळी या रिटर्निंग ऑफिसरचे फोटो एका फोटो ग्राफरने काढले. त्यानंतर तिचे फोटो त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या महिलेच्य़ा नावाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु तिचे नाव रिना द्विवेदी असून ती लखनौच्या पी डब्लू जी विभागात कनिष्ठ सहायक आहे. ५ मे रोजी लखनौच्या नगराममध्ये बुथ नंबर १७३ वर तिची नियुक्ती करण्यात आली होती.

याबाबत रिना यांनी आपले फोटो व्हायरल होण्यावर काही सकारात्मक तर काही नाकारत्मक गोष्टी पसरविल्या जात असल्याची प्रतिक्रिया दिलीय त्या ज्या मतदान केंद्रावर नेमणूकीला होत्या. त्या मतदान केंद्रावर ७० टक्के मतदान झाल्याचंही त्यांनी सांगितलं.