Yemeni Family Overstaying Pune Deported | कोंढव्यात अवैधरित्या वास्तव्यास असणार्‍या येमेन देशाच्या 6 जणांवर विशेष शाखेकडून डिपोर्टेशनची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yemeni Family Overstaying Pune Deported | शहरातील कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत (Kondhwa Police Station Limits) पासपोर्ट (Passport) आणि व्हिसाशिवाय (Visa) अवैधरित्या वास्तव्यास असणार्‍या येमेन (Yemen) देशाच्या 6 जणांवर परकिय नागरिक नोंदणी शाखेच्या (FRO Branch) पथकाने ऑक्टोबर महिन्यात ताब्यात घेतले होते. त्यामध्ये 2 पुरूष, एक महिला आणि 3 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. (Yemeni Family Overstaying Pune Deported)

 

ताब्यात घेण्यात आलेले सर्वजण हे विद्यार्थी व्हिसावर भारतात आले होते. सन 2017 पासुन ते अवैधरित्या वास्तव्यास होते. एफआरओ कार्यालयाने (Foreigners Registration Office) ताब्यात घेतल्यानंतर दोन पुरूषांना कोंढवा परिसरात देखरेखीखाली ठेवले तर महिलेस तिच्या 3 अल्पवयीन अपत्यांसह हडपसरच्या रेस्क्यु फाऊंडेशन येथे देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. येमेनच्या नागरिकांना डिपोर्टेशनवर येमेन येथे जाण्यास विरोध होता. त्यामुळे त्यांनी सदरील कारवाई विरूध्द लष्कर न्यायालयात (Lashkar Court) याचिका दाखल केली होती. सदरील याचिका एफआरओ कार्यालयाच्या युक्तीवादामुळे फेटाळण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली. तेथे (Bombay High Court) देखील त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर दि. 24 डिसेंबर 2022 रोजी मुंबई विमानतळ (Mumbai International Airport) येथे त्यांना नेण्यात आले. एफआरओच्या कार्यालयाने हद्दपारीची कारवाई करत त्यांना येमेन देशात पाठविण्यात आले.

सदरील कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik),
विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा (R Raja IPS), मुंबईतील विशेष शाखा-2 च्या उपायुक्त नियती ठाकर (Niyati Thakkar IPS),
सहाय्यक आयुक्त रमाकांत माने (ACP Ramakant Mane), सहाय्यक आयुक्त भुपेश बावनकर (ACP Bhavankar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Sr PI Jagannath Kalaskar), सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, पोलिस अंमलदार पॉल अ‍ॅन्थनी, शैलेंद्र वाणी, दिलीप काची, तानाजी सरडे, सचिन सहाणे, निलीमा खिलारे, सुहास धायगुडे, केदार जाधव, संजय निगडे, मनिषा ताटे आणि काजल कुंभार यांच्या पथकाने केली आहे. (Pune Crime)

 

डिपोर्टेशन करण्यात आलेल्यांपैकी दोघे भाऊ होते. ते सन 2016-2017 मध्ये विद्यार्थी व्हिसावर भारतात आले होते.
त्यानंतर त्यांनी अभ्यासावर लक्ष दिले नाही.
दरम्यान, दोघांपैकी एकाची पत्नी तिन मुलांसह वेगळया व्हिसावर भारतात आली होती.

 

Web Title :- Yemeni Family Overstaying Pune Deported | yemeni-family-overstaying-pune-deported-pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अजित पवारांचा बावनकुळेंना इशारा, म्हणाले-‘ठरवलं ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, करेक्ट कार्यक्रम करेल’

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

Uddhav Thackeray | कर्नाटक विरोधात विधीमंडळात एकमताने ठराव मंजुर होताच समोर आली उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…