Yerawada Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार ! तरुणीने Social Media वर ब्लॉक केले म्हणून लहान भावाचे केले अपहरण, अ‍ॅट्रोसिटीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Crime News | A young man raped a mentally retarded minor girl; The nature of the rape was revealed in counseling, he had been abusing her for three years

पुणे : Yerawada Pune Crime News | दोघांमधील फोटो व्हायरल करील, अशी धमकी देऊन लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला ती अल्पवयीन असल्यापासून तिच्यावर एकजण लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) करत होता. तिने अनब्लॉक करावे म्हणून तिच्या लहान भावाचे घरातून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Rape Case)

याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी असीफ सलीम शेख Asif Salim Shaikh (रा. नागपूर चाळ, येरवडा) याच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी कायदा, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवड्यातील नागपूर चाळ १ नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. (POCSO Act)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका ब्युटी पार्लरमध्ये पार्लरचा कोर्स करण्यासाठी जात होती. त्याच पार्लरमध्ये कोर्स करणार्‍या एका मुलीच्या मावस भावाशी फिर्यादीची इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यांच्यात सोशल मीडियावर गप्पा मारत असताना त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. फिर्यादी या १६ वर्षाच्या असताना असिफ याने तिला नागपूर चाळ येथील घरी नेले. तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर तो वेळोवेळी फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवू लागला. या प्रकाराने वैतागल्याने तिने त्याच्याशी संबंध तोडले. त्याला ब्लॉक केले. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता फिर्यादी लोहगाव बसस्टॉप येथून पायी घरी जात असताना अचानक असीफ दुचाकीवरुन फिर्यादीच्या ७ वर्षाच्या भावाला घेऊन आला. तो खूप घाबरलेला होता. असिफ याने जबरदस्तीने गाडीवर बसवून घेऊन आला असे त्याने सांगितले. फिर्यादीने त्याच्या कब्जातून भावाला हिसकावून घेतले. त्यावेळी असिफ म्हणाला की, तु माझ्यासोबत बोल, मला अनब्लॉक कर, नाही तर मी तुला व तुझ्या भावाला बघुन घेईल, अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरलेल्या या तरुणीने थेट लोहगाव पोलीस चौकी गाठत पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (PI Ravindra Shelke) तपास करीत आहेत. या घटनेनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिस स्टेशनकडे धाव देखील घेतली होती.

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime Court News | Stepmother and father were beating 10-year-old girl with a candle, father was doing bad touch, District Court orders Dighi Police to register a case under POCSO

Pune Crime Court News | सावत्र आई आणि वडिल 10 वर्षाच्या मुलीला मेणबत्तीने देत होते चटके, वडिल करत होते बॅड टच, जिल्हा न्यायालयाने दिघी पोलिसांना पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश