Yerawada Pune Crime News | भररस्त्यात तरुणीसोबत असभ्य वर्तन, येरवडा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yerawada Pune Crime News | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणींसोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग (Molestation Case) करण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून शहरात वाढत आहेत. कल्याणीनगर ते शास्त्रीनगर चौकाकडे (Kalyaninagar to Shastrinagar Chowk) जाणाऱ्या तरुणीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.19) रात्री अकराच्या सुमारास एच.एस.बी.सी ऑफिस समोर घडली आहे.(Yerawada Pune Crime News)

याबाबत 25 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.20) येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 354, 337 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांची बहिण व मैत्रिण कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करुन घरी परत जात असताना एच.एस.बी.सी ऑफिस समोर एका अनोळखी व्यक्तीने पाठीमागून येऊन असभ्य वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

पुणे : घरासमोर भांडी घासत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरामध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केला.
पिडीत मुलीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत
(POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.20) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
यावरुन समित भिमराव गायकवाड (वय-19 रा. बालेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Hit And Run Case | पुणे हिट अँड रन प्रकरणात कारवाईला वेग! बार मालक, मॅनेजरसह पाच जणांना अटक

Maharashtra 12th HSC Results 2024 | 12 वी च्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी, एकुण निकाल 93.37 टक्के, कोकण विभाग अव्वल

Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मी दारु पितो, पप्पांनीच मला गाडी दिली’ आरोपी मुलाचा कबुली जबाब

Sinhagad Fort Road Pune | सिंहगडावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता ‘या’ कालावधीत बंद, गडावर पायी जाण्यासाठी पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या

Uddhav Thackeray Group On PM Modi | भाजप व दोन बनावट कंपन्यांचा प्रत्येक मतदारसंघात 100 कोटींचा खेळ, अजित पवारांच्या बारामतीच्या घरातील…, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा