पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Yerawada Pune Crime News | पुणे ड्रग्ज फ्री या मोहिमेच्या अंतर्गत शहरात होणारा अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीन गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Norotics Cell Pune) सातत्याने कारवाई करीत असते. येरवडा भागात केलेल्या एका कारवाईत अंमली पदार्थाची विक्री करत असलेल्याकडून पोलिसांनी २३ लाख ३८ हजार ४०० रुपयांचे मॅफेड्रॉन (एम डी) जप्त केले आहे.
अहमद वाहिद खान (वय ४५, रा. लक्ष्मीनगर, समता मित्र मंडळाजवळ, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व अंमलदार हे येरवडा परिसरात बुधवारी १५ जानेवारी रोजी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना बातमी मिळाली. त्या बातमीची खात्री करुन पोलिसांनी अहमद खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यात २२ लाख रुपयांचा ११० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज असा २३ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime Branch)
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शना गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, साहिल शेख, रवींद्र रोकडे, चेतन गायकवाड, अझिम शेख, संदिप जाधव, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड, अमोल गायकवाड, विशाल निलख यांनी केली आहे.